Vaibhav Sooryavanshi: एअरपोर्टवर तरुणीने थेटे केले श्रेयसला प्रपोज, वैभवही पाहत राहिला, Video Viral
Vaibhav Sooryavanshi: श्रेयस अय्यरला एका तरुणीने एअरपोर्टवर तरुणीने प्रपोज केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओची जास्त चर्चा होत आहे कारण वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अनेक भारतीय खेळाडू सध्या जपानमध्ये पोहोचले आहे. आयची नागोया येथे ही स्पर्धा खेळवली जात असून भारताने आतापर्यंत अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. याशिवाय महिलां खेळाडूंनीही भारताचे अजून एक पदकही निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भारताचा पुरूष संघ स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला. यादरम्यान एअरपोर्टवर श्रेयस अय्यरबरोबर एक किस्सा घडला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रेयसला थेट तरुणीने प्रपोज केले ज्याच्यावर वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रियाही विशेष लक्ष वेधणारी ठरली.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ जपानमध्ये दाखल झाला असून आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघाच्या जपानमधील आगमनाचा व्हिडीओ BCCIने शेअर केला आहे, त्यात खेळाडू आगामी सामन्यांसाठी सज्ज होताना दिसत आहे. रेव्हस्पोर्ट्जने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशी एअरपोर्टमधून बाहेर येताना दिसत आहे. हे दोन्ही खेळाडू आपल्या टीम बसकडे जात आहेत. यादरम्यान काही चाहते एअरपोर्टबाहेर उभे होते. तितक्यात एक चाहती श्रेयस अय्यरला पाहताच उत्साही झाली आणि जे म्हणाली त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
🚨 Funny moments between Shreyas Iyer with his fans 🚨
Iyer Fan Girl – “Shreyas I like you, I know you like me”. 😅
Shreyas Iyer – “Sorry”. 😜
Wait for Vaibhav Suryavanshi reaction 😂 pic.twitter.com/fJKouy29uA
— VIKAS (@Vikas662005) September 21, 2026