AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा घातपात की अपघात? अहवाल महिन्याभरात येणार? AAIB ने काय सांगितलं

मोठी बातमी समोर येत आहे,  अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल आता  एका महिन्यात येण्याची शक्यता आहे.  अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीवर AAIB कडून तसं अश्वासन देण्यात आलं आहे.

अजित पवार यांचा घातपात की अपघात? अहवाल महिन्याभरात येणार? AAIB ने काय सांगितलं
Ajit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 8:28 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे,  अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल आता  एका महिन्यात येण्याची शक्यता आहे.  अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीवर AAIB कडून तसं अश्वासन देण्यात आलं आहे. अजित पवार यांचा घातपात की अपघात असा सवाल करणारी तक्रार दाखल करण्यात आली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शन एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात आज एएआयबीच्या कार्यालयात जाऊन डीजी यांची भेट घेतल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे.  महिन्याभरात अपघाताबाबत सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, अशी अपेक्षा या भेटीनंतर हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या अपघाताच अहवाल महिन्याभरात येणार का?  हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले हेमंत पाटील?

अजित पवारांचा अपघात की घातपात? या संदर्भात बारामतीमध्ये तक्रार केली होती, या तक्रारीची दाखल घेतली नाही म्हणून तहसीलदारांची भेट घेतली. त्यांनीही दखल घेतली नाही म्हणून मग मी उच्च न्यायालयात गेलो. तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचा तपास AAIB करत आहे. यावर मी जून महिन्यात AAIB कडे तक्रार केली. मात्र तक्रारीवर उत्तर मिळाले नाही, म्हणून आज AAIB चे डीजी यांची मी भेट घेतली. त्यांनी सांगितले की तपास एका महिन्यात पूर्ण करून अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल जारी करू,  अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार केली होती, एका महिन्यात अहवाल नाही मिळाला तर पुन्हा उच्च न्यायालयात जाणार, असा इशारा देखील यावेळी हेमंत पाटील यांनी दिला आहे.

अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असतानाच विमान थेट जमिनीवर कोसळलं, या भीषण अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन