Vaibhav Suryavanshi : वैभव भारतीय क्रिकेटच्या या दिग्गजासोबत फक्त 30 मिनिटं बोलला, नंतर ठोकल्या थेट 204 धावा, मॅचनंतर सूर्यवंशीचा मोठा खुलासा

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने काल तुफानी बॅटिंग केली. क्रिकेट विश्व त्याच्या कामगिरीने थक्क झालं. त्याच्या कालच्या ऐतिहासिक खेळीने किकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नव्या किर्तीमानाची नोंद झाली आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव भारतीय क्रिकेटच्या या दिग्गजासोबत फक्त 30 मिनिटं बोलला, नंतर ठोकल्या थेट 204 धावा, मॅचनंतर सूर्यवंशीचा मोठा खुलासा
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Nov 25, 2026 | 12:59 PM

टीम इंडियाचं भविष्य वैभव सूर्यवंशीने काल क्रिकेट विश्वाला चकीत केलं. मागच्या दीड वर्षांपासून या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात चर्चा आहे, ही चर्चा का होते? ते वैभवने काल दाखवून दिलं. आशियाई रायजिंग स्टार्स क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वैभवने काल यूएई विरुद्ध डबल सेंच्युरी झळवली. महत्वाचं म्हणजे अवघ्या 53 चेंडूत त्याने 204 धावा ठोकल्या. वैभवने मैदानात फोर-सिक्सचा पाऊस पाडला. वैभवच्या धाकड खेळाच्या जोरावर इंडिया ए ने 250 धावांचं टार्गेट अवघ्या 14.2 ओव्हर्समध्ये चेज केलं. वैभवच्या मैदानावरील कामगिरीने काल क्रिकेट विश्व थक्क झालं. वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. वैभवच्या कालच्या ऐतिहासिक खेळीने किकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नव्या किर्तीमानाची नोंद झाली आहे. वैभवने कालच्या UAE विरूद्धच्या सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह सोबत चर्चा केली होती. युवराजचा सल्ला त्याला खूप उपयोगात आला.

वैभव सूर्यवंशी या मॅच आधी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह सोबत बोलला होता. मॅच आधी वडिल, कोच, एक मित्र आणि युवराज सिंह सोबत बोलल्याचं वैभवने सांगितलं. युवराज सिंह आपला हिरो असल्याचं वैभवने सांगितलं. “फलंदाजीत येणाऱ्या अडचणींबद्दल मी युवराज सिंह सोबत मोकळेपणाने बोललो. त्यांनी मला अनेक टेक्निकल गोष्टी सांगितल्या. फलंदाजीबद्दल काही सल्ले दिले” असं वैभवने सांगितलं. 20 चेंडू खेळणार असशील तर वेगळ्या अंदाजात खेळ असा युवराजने वैभवला सल्ला दिला. युवराजचा हा सल्ला वैभवच्या फायद्याचा ठरला.

Loading...

वैभवने स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं?

युवराज सिंह आपला आदर्श असल्याचं वैभवने सांगितलं. युवराजकडून मिळालेला सल्ला आपल्या बॅटिंगमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. त्या शिवाय वैभवने आपल्या चूका सुधारण्यासाठी जुन्या मॅचचे व्हिडिओ सुद्धा बघितले. व्हिडिओ पाहताना फलंदाजीत काय चूका झाल्या आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या चूका सुधारल्याचं वैभवने मान्य केलं. वैभव सूर्यवंशी भारताच्या सिनियर क्रिकेट संघाचाही भाग आहे.  त्याचा टीम इंडियाच्या टी20 क्रिकेट संघात नेहमी समावेश केला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us