AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anaya Bangar : मुलापासून मुलगी झालेल्या अनाया बांगर थेट भारत सोडून गाजवणार ऑस्ट्रेलिया, मैदानात तांडव, सर्व हैराण..

भारतीय क्रिकेटर अनाया बांगर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. ती ट्रान्सजेंडर महिला म्हणून ओळखली जाते. लिंग बदलापूर्वी अनाया एक क्रिकेटपटू होती. तिने मुंबईसाठी विविध स्तरांवर क्रिकेट खेळले आहे.

Anaya Bangar : मुलापासून मुलगी झालेल्या अनाया बांगर थेट भारत सोडून गाजवणार ऑस्ट्रेलिया, मैदानात तांडव, सर्व हैराण..
Anaya Bangar
| Updated on: Oct 14, 2026 | 4:54 PM
Share

टीम इंडियाची माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची लेक अनाया बांगर तूफान चर्चेत असते. अनाया ही अगोदर पुरूष होती. त्यानंतर तिने लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि ती थेट आर्यनची अनाया बनली. मात्र, हा काळ तिच्यासाठी म्हणावा तेवढा नक्कीच सोप्पा नव्हता. ती ट्रान्सजेंडर महिला म्हणून ओळखली जाते. लिंग बदलापूर्वी अनाया एक क्रिकेटपटू होती. तिने मुंबईसाठी विविध स्तरांवर क्रिकेट खेळले आहे. तिने आपल्या आयुष्याबाबत अनेक शोमध्ये मोठे खुलासे केले आहेत. जेंडर अफर्मिंग सर्जरी करून मोठी लॉटरी अनायाला लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनायाला त्यांच्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. 2027 पासून अनायाला ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे. मागील काही वर्षांपासून अनायाला खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. शेवटी तिच्या मेहनतीला यश आले.

ती आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात खेळताना दिसणार आहे. तिने नुकताच ट्रेनिंग सुरू केले. अनाया हिला सिक्स मारताना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. एका मागून एक ती सिक्स मारताना दिसली. अनायाने मैदानात तांडव केले. सर्वजण चांगलेच चकित झाले. ऑस्ट्रेलियामध्ये वुमेन्स क्रिकेटमध्ये तिला संधी मिळालीये. सरावादरम्यान अनाया जोरदार सिक्स मारताना दिसली. ऑस्ट्रेलियामध्ये वुमेन्स सामुदायिक क्रिकेटमध्ये ती दिसणार आहे.

अनायाच्या रक्ताची टेस्टोस्टेरॉनची पातळी 10 नॅनोमोल्स प्रती लीटरपेक्षा कमी असेल तर तिला बीबीएसमध्ये खेळता येईल. रक्ताची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असल्याने तिला मैदान गाजवता येणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अनाया दिसणार आहे. यावेळी अनाया बांगर हिला भेटण्यासाठी सरफराज खान आला. मुशीर खान, नौशाद खान हे तिघे मिळून सराव करताना दिसले. सरफराज आणि मुशीरसोबत ती गळाभेट घेताना दिसली.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

सराव सुरू करताच अनाया जोरदार बॅटिंग करताना दिसतंय. त्यामुळे तिने धमाकेदार पद्धतीने कमबॅक केल्याचे बघायला मिळतंय. अनाया भविष्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तिने प्रयत्न केला. पण तिच्या प्रयत्नांना यश आले नाही. ICC च्या नियमांनुसार प्युबर्टीनंतर ट्रान्सजेंडर झालेल्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्यावर मर्यादा आहेत.

Follow Us
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...