‘या’ कुत्र्यांचा पोलीस आणि सैन्यातील श्वान पथकात समावेश, नेमकं ट्रेनिंग कसं देतात?

सर्वांनीच सैन्याकडे किंवा पोलिसांकडे विशेष प्रकारचे कुत्रे असल्याचं पाहिलं असेल. या कुत्र्यांचं स्वतंत्र पथकही तयार केलं जातं ज्याला श्वान पथक म्हणतात.

'या' कुत्र्यांचा पोलीस आणि सैन्यातील श्वान पथकात समावेश, नेमकं ट्रेनिंग कसं देतात?
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:41 PM

नवी दिल्ली : सर्वांनीच सैन्याकडे किंवा पोलिसांकडे विशेष प्रकारचे कुत्रे असल्याचं पाहिलं असेल. या कुत्र्यांचं स्वतंत्र पथकही तयार केलं जातं ज्याला श्वान पथक म्हणतात. सैन्यात आणि पोलीस विभागात या पथकांना फार महत्त्व असतं. बॉम्बशोधक पथकात हे श्वान पथक अनेक जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलतं. त्यामुळेच अनेकांना हे श्वान पथक बॉम्ब कसा शोधता असाही प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे पोलीस किंवा सैन्याकडून श्वान पथकांना दिलं जाणारं खास प्रशिक्षण. या प्रशिक्षणाच्या जोरावरच आता हेच श्वान पथक कोरोनाचाही माग काढणार आहे (List of Dogs in Army or Police Squad how their training happen).

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले पण सैन्याने या श्वान पथकाला इतकं प्रशिक्षित केलंय की ते आता थेट कोरोनाचं निदान करत आहेत. त्यांना घाम आणि मुत्राच्या वासावरुन कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे कळत आहे. या श्वान पथकाला दिल्लीतील एका आरोग्य कॅम्पमध्ये तैनात करण्यात आलं होतं. या ठिकाणी त्यांनी 806 नमुन्यांची तपासणी केली. यातील 18 नमुने कोरोना पॉझिटीव्ह निघाले. या प्रयोगात कुत्र्यांना जे नमुने कोरोना बाधित असल्याचं लक्षात आलं तेथे ते जाऊन बसले.

शोध पथकातील हे कुत्रे नेमके कसे निवडतात?

काय शोधायचं आहे यानुसार या कामात वेगवेगळ्या प्रजातीच्या (ब्रीड) कुत्र्यांचा उपयोग केला जातो. त्याप्रमाणेच त्यांना प्रशिक्षित केलं जातं. सामान्यपणे सैन्यात जर्मनशेफर्ड, लेब्रोडोर, बेल्जियन शेफर्ड्स आणि ग्रेट स्विस माऊंटेन या प्रजातीच्या कुत्र्यांचा उपयोग होतो. भारतीय प्रजातींमध्ये (ब्रीड) मुधोल हाऊंडचाही उपयोग श्वान पथकात शोधमोहिमेसाठी होतो. मोधुल हाऊंड एकमेव भारतीय प्रजाती आहे जिला सैन्यात सहभागी करुन घेण्यात आलंय. यामागील प्रमुख कारण म्हणजे हे भारतीय प्रजातीचं श्वान पथक सीमेवरील शत्रुच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवतं आणि लवकर स्फोटकांचा शोध लावतं.

या श्वान पथकांचं प्रशिक्षण कुठं होतं?

मेरठ, शाहजहांपुर, चंडीगड या ठिकाणी या श्वान पथकांना खास प्रशिक्षण दिलं जातं.

या प्रशिक्षण केंद्रांमध्ये या श्वान पथकांसाठी वेगवेगळे कोर्स असतात. यात बेसिक डॉग ट्रेनर्स कोर्स, बेसिक आर्मी डॉग ट्रेनर्स कोर्स फॉर इंडियन एअर फोर्स अशा अभ्यासक्रमांचा समावेश असतो. त्यांना जवानांप्रमाणेच प्रशिक्षित केलं जातं.

सैन्यातील हे श्वान पथक डॉग्स ट्रेकिंग, गार्डिंग, माईन डिटेक्शन, एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन, इंफंट्री पेट्रोलिंग, अॅवेलॉन्च रेस्क्यू ऑपरेशन, सर्च, रेस्क्यू आणि नार्कोटिक डिटेक्शनचं काम करते. सरकार या पथकांवर मोठा खर्चही करते. 2018-19 दरम्यान, सैन्याच्या श्वान पथकांवर 1 कोटी 24 लाख रुपयांचा खर्च झाला होता. सैन्यात 25 फुल डॉग युनिट आणि हाफ युनिट आहेत. फुल युनिटमध्ये 24 आणि हाफ युनिटमध्ये 12 कुत्रे असतात.

संबंधित बातम्या :

आता श्वान घेणार कोरोना व्हायरसचा शोध; भारतीय लष्कराकडून श्वानांना खास ट्रेनिंग

इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !

भटक्या कुत्र्याने केला हत्येचा उलगडा, चार तासात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

व्हिडीओ पाहा :

List of Dogs in Army or Police Squad how their training happen

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.