आता श्वान घेणार कोरोना व्हायरसचा शोध; भारतीय लष्कराकडून श्वानांना खास ट्रेनिंग

भारताने कोरोनाची लस शोधल्यानंतर आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. (Indian Army trains indigenous dog to detect Covid-19)

आता श्वान घेणार कोरोना व्हायरसचा शोध; भारतीय लष्कराकडून श्वानांना खास ट्रेनिंग
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 7:28 PM

नवी दिल्ली: भारताने कोरोनाची लस शोधल्यानंतर आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. आता देशी श्नानांकडून कोरोना संक्रमणाचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय लष्कराने काही श्वानांना खास प्रशिक्षण दिलं असून हे श्वान कोरोना संक्रमणाचा शोध घेऊन कोरोना फ्रंटलाईन टीमची मदत करणार आहे. (Indian Army trains indigenous dog to detect Covid-19)

जगभरातून अजूनही कोरोना संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे भारतीय लष्कराच्या डॉग स्क्वॉर्डनने कोरोना संक्रमणाचा शोध घेण्यासाठी काही देशी श्वानांनाच खास प्रशिक्षण दिलं आहे. चिप्पिपराई जातीचे हे श्वान आहेत. त्यांना कोरोना संक्रमणाचा शोध कसा घ्यायाचा याची ट्रेनिंग देण्यात आली आहे. जया, कॅस्पर आणि मणी अशी या श्वानांची नावे आहेत. ही श्वाने कोरोना संक्रमणाचा शोध घेणार आहेत.

मूत्र आणि घामाद्वारे शोध घेणार

घाम आणि मूत्राच्या नमुण्याच्या आधारे कोरोना संक्रमणाचा शोध घेण्याची ट्रेनिंग या श्वानांना देण्यात आली आहे. कॅस्पर हे कॉकर स्पायनल जातीचे श्वान आहे. जया आणि मणी हे तामिळनाडूच्या चिपिपाराई जातीचे श्वान आहेत. या श्वानांचे शरीर आणि पाय खूप लांब असतात. जया, कॅस्परला पूर्ण ट्रेनिंग देण्यात आली आहे. तर मणीला ट्रेनिंग दिली जात आहे.

कोरोना नमुने असं ओळखतात

जया आणि कॅस्परला दिल्लीतील एका ट्रान्झिस्ट कँम्पमध्ये तैनात करण्यात आले होते. तिथे 806 नमुन्यांचा या श्वानांनी तपास केला. त्यात 18 नमुने पॉझिटिव्ह निघाले. जे सँपल पॉझिटिव्ह निघतात, त्याच्या बाजूला जाऊन हे श्वान बसतात. त्यावरून हे नमुने पॉझिटिव्ह असल्याचं ओळखता येतं, असं लष्कराने स्पष्ट केलं.

ट्रान्झिस्ट कँम्पमध्ये तैनात करणार

भारतीय लष्कराने सध्या 7 श्वानांना ट्रेनिंग दिली आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी दुसऱ्या परिसरातील टान्झिस्ट कँम्पमध्ये तैनात केलं जातं. कँसर, मलेरिया आणि पार्किन्सस सारख्या आजाराचा शोध घेण्याची ट्रेनिंगही या श्वानांना देण्यात आली आहे. ज्या श्नानांना कोरोना संक्रमणाचा शोध घेण्याची ट्रेनिंग दिली आहे, त्या श्वानांमध्ये संक्रमण शोधण्याची क्षमता आहे. हे श्वान आजाराचा तात्काळ शोध घेत असल्याचंही लष्कराने स्पष्ट केलं.

श्वानांना संक्रमणाचा धोका नाही

जगभरात मेडिकल डिटेक्शन डॉग्सची पद्धत आहे. अनेक देशात कँसर, मलेरिया आणि मधुमेहासारख्या आजाराचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेतली जाते. हे श्वान आजाराच्या वास्तविक वेळेचा पत्ता लावण्यात यशस्वी होतात की नाही, याबाबत संशोधन सुरू आहे, असं मेरठच्या आरव्हीसी केंद्राचे ट्रेनर लेफ्टिनंट कर्नल सुरिंदर सैनी यांनी सांगितलं. या श्वानांनी कोरोना संक्रमणाचे शोधलेले सँपल पूर्णपणे सुरक्षित आहेत. श्वानांना सुंघण्यासाठी देण्यात आलेले सँपल अल्ट्रा व्हायलेट लाईटमधून जातात. त्यामुळे या श्वानांना व्हायरसचा धोका होत नाही, असं सैनी म्हणाले. (Indian Army trains indigenous dog to detect Covid-19)

11 देशात श्वानांना ट्रेनिंग

फ्रान्स, जर्मनी, यूएई, ब्रिटन, रशिया, फिनलँड, लेबनान, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम आणि चिली सारख्या अनेक देशात कोरोना व्हायरसचा शोध घेण्यासाठी श्वानांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्थानकांवर या श्वानांना तैनात करून कोरोना संक्रमितांचा शोध घेतला जात आहे. (Indian Army trains indigenous dog to detect Covid-19)

संबंधित बातम्या:

Pudina Benefits | पुदिन्यामुळे मिळेल त्वचेला चमक, केसांची गळतीही थांबेल! वाचा याचे फायदे…

Health | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…

Corona | भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने उतार कसा झाला? वैज्ञानिकांनाही पडलाय प्रश्न..

(Indian Army trains indigenous dog to detect Covid-19)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.