Pudina Benefits | पुदिन्यामुळे मिळेल त्वचेला चमक, केसांची गळतीही थांबेल! वाचा याचे फायदे…

पुदिन्यामध्ये असे अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

Pudina Benefits | पुदिन्यामुळे मिळेल त्वचेला चमक, केसांची गळतीही थांबेल! वाचा याचे फायदे...
पुदीना
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 7:02 PM

मुंबई : पुदिना जवळजवळ प्रत्येक घरात वापरला जातो. चटणीमध्ये किंवा जेवणात टाकून आपण पुदिना खातो. यापासून बनवलेला कोणताही पदार्थ खूप चविष्ट लागतो. तसेच, याच्या सेवनाने आपल्याला ताजेपणा मिळतो. हे एक नैसर्गिक औषध देखील आहे, याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. आपल्या आहारात वापरला जाणारा पुदिना आपले केस आणि त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी खूप प्रभावी आहे (Pudina aka peppermint beneficial for hair and skin).

पुदिन्यामध्ये असे अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. जर आपले केस खूपच गळत असतील आणि जर ते कोरडे वाटत असतील, किंवा अगदीच निर्जीव वाटत असतील, तर आपल्या आहारात पुदिन्याच्या समावेश करा. तसेच हेअर मास्कप्रमाणे आपल्या केसांमध्ये पुदिना लावा.

यासाठी चण्याची डाळ व दही एकत्र करून पेस्ट बनवा आणि त्यात पुदिन्याची 8 ते 10 पाने वाटून टाका. तयार पेस्ट आपल्या केसांवर आणि स्काल्पवर 30 मिनिटांसाठी लावा आणि थोड्या वेळाने केस स्वच्छ धुवा.

आठवड्यातून दोनदा वापरा हेअर मास्क

सुरुवातीच्या काळात आठवड्यातून दोनदा ही पेस्ट केसांवर वापरा. यानंतर, जर आपण आठवड्यातून एकदाच याचा वापर केला, तरी आपले केस सुंदर, दाट आणि चमकदार बनतील.

सूज दूर करतो पुदिना

जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर सूज येत असेल, तर यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या पानात एक चमचा दही मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट सूज आलेल्या भागावर लावा. अर्धा तास ही पेस्ट अशीच राहू द्या. मग ती धुवून टाका. यामुळे सुजेपासून खूप आराम मिळेल.

जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि त्यातून रक्तही आलं असेल, तर त्या भागावर सूज येते. अशावेळी ही पेस्ट अजिबात लावू नका. अशा दुखापतींवर डॉक्टरांद्वारे उपचार घेणे योग्य आहे (Pudina aka peppermint beneficial for hair and skin).

त्वचेवरील डाग काढून टाकेल पुदिना

आपल्या त्वचेवर डाग किंवा पुरळ असल्यास आपण पुदिन्याच्या सहाय्याने या समस्यांवर मात करू शकता. पुदिना त्वचेला थंडावा प्रदान करून जळजळ देखील रोखते. मुरुमांमुळे खूप खाज सुटली किंवा वेदना होत असतील त्यावरही आपण याचा वापर करू शकता.

असा बनवा पुदिना फेस पॅक

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी पुदिन्याची 8-10 पाने घेऊन, त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब घाला आणि पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये एक बेसन पीठ आणि दोन चिमूटभर हळद मिसळा. आता ही पेस्ट संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.

20 मिनिटांनी आपला चेहरा धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. काही दिवस ही पेस्ट सतत वापरल्यानंतर, हे स्पॉट्स आणि डाग हळूहळू कमी होऊ लागतील आणि नंतर काही काळानंतर ते पूर्णपणे नाहीसे होतील.

(Pudina aka peppermint beneficial for hair and skin)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.