Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!

काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत.

Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडण्याची समस्या सामान्य आहे. परंतु, काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत. जर, आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर, आपणही घरगुती ‘उटणं’ वापरुन पाहू शकता. यामुळे तुमची कोरडेपणाची समस्या देखील दूर होईल आणि काही दिवसांत त्वचाही चमकदार दिसू लागेल (Skin Care Home made ubtan face pack for dry skin).

मसूर डाळ आणि दूध

थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.

हळद आणि बेसन पीठ

हळद आणि बेसन पीठाचे उठणे तयार करण्यासाठी, एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता.

मुलतानी माती आणि ऑलिव्ह ऑईल

मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात, ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दीड तासानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल (Skin Care Home made ubtan face pack for dry skin).

केळी आणि खोबरेल तेल

केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

हे देखील लक्षात ठेवा :

  1. फेस पॅक / उठणे लावून तोंड धुल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.
  2. बर्‍याच वेळा त्वचेवरील मृत पेशी न निघाल्यामुळे देखील कोरडेपणाची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस स्क्रब करा.
  3. रात्री झोपताना बदामाचे तेल कोमट करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर थोडा वेळ मसाज करा.
  4. एक चमचा लोणी आणि एक चमचा बदाम तेल व्यवस्थित मिक्स करा. या तेलाने आपल्या त्वचेवर आणि हाता-पायांवर हलका मसाज करा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने त्वचेची खोलवर मॉइश्चरायझिंगही होते.

(Skin Care Home made ubtan face pack for dry skin)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI