Lips Care | थंडीच्या दिवसांत अशाप्रकारे घ्या आपल्या नाजूक ओठांची काळजी!

Lips Care | थंडीच्या दिवसांत अशाप्रकारे घ्या आपल्या नाजूक ओठांची काळजी!
ओठ

हिवाळ्याच्या मोसमात कोरड्या हवामानामुळे ओठ रुक्ष होणे (dry lips in winter), अथवा ओठ फुटणे या समस्या सामान्य आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Dec 15, 2020 | 5:25 PM

मुंबई : हिवाळ्याच्या मोसमात कोरड्या हवामानामुळे ओठ रुक्ष होणे (dry lips in winter), अथवा ओठ फुटणे या समस्या सामान्य आहेत. बर्‍याच वेळा ही समस्या इतकी वेदनादायक होते की, ओठातून रक्त येऊ लागते. अशा परिस्थितीत आपण लिपबाम किंवा व्हॅसलीनचा वापर करुन घराबाहेर गेल्यास धूळी कणांमुळे समस्या अधिकच वाढते. जर आपणही या प्रकारच्या समस्येने कंटाळला असाल, चिंतेत असाल तर, त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. या समस्येवर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्या समस्यांना अगदी सहजगत्या सोडवतील आणि तुमच्या ओठांना मुलायम देखील बनवतील (Easy tips and Home remedies to heal dry lips in winter).

झोपताना नाभीवर मोहरीचे तेल लावा.

रात्री झोपताना आपल्या नाभीवर म्हणजेच बेंबीवर मोहरीचे तेल लावा. यामुळे काहीच वेळात, ओठ फुटण्याची समस्या दूर होईल. तसेच, काही दिवसांतच ओठ मऊ आणि गुलाबी होतील. मोहरीच्या तेलाने असे आणखी फायदे आपल्याला दिसून येतील.

भरपूर पाणी प्या.

लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा शरीरात ओलावा नसतो तेव्हाच अशा प्रकारच्या समस्या वाढतात. लोक सहसा हिवाळ्यात कमी पाणी पितात. यामुळे त्वचा आणि ओठ कोरडे फुटू लागतात. या समस्यांपासून ओठांचा बचाव करण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसांतही भरपूर पाणी प्या.

ओठांवर दूधाची साय लावा.

रात्री झोपताना फुठलेल्या ओठांवर दूधाची साय लावून झोपा. यामुळे एका रात्रीतच आपल्याला या समस्येतून खूप आराम मिळेल. जर, आपण दररोज असे केले तर, ओठांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, ओठ मऊ होतील. दूधाची साय अर्थात मलई ओठांच्या नाजूक त्वचेवर डीप मॉइश्चरायझर म्हणून काम करते (Easy tips and Home remedies to heal dry lips in winter).

गुलाबची पाने आणि मध देखील प्रभावी

ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबची पाने देखील मदत करतात. गुलाबाची पाने बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपेच्या वेळी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

  1. वर नमूद केलेला कोणताही उपाय केवळ रात्रीच्या वेळीच करून पहा. कारण, दिवसा आपण घराबाहेर पडत असल्याने धूळी कणांमुळे या समस्या वाढू शकतात.
  2. हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर जाताना ओठांवर लिपस्टिक, लीपबाम वगैरे लावणे टाळा.
  3. बर्‍याच जणांना ओठ कोरडे पडले की, त्यांना जिभेने ओले करण्याची किंवा दाताने चावण्याची सवय असते. मात्र, चुकूनही असे करू नका. यामुळे आपली समस्या कमी होण्याऐवजी वाढेल.
  4. धूम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय असल्यास, अशा सवयी वेळीच सोडून द्या. अन्यथा कोणताही उपाय काम करणार नाही.
  5. ओठांवर काहीही लावण्यापूर्वी सर्वप्रथम ओठ पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतरच कोणताही बाम, जेल इत्यादि लावा.

(Easy tips and Home remedies to heal dry lips in winter)

(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे.  उपचारांपूर्वी आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें