Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत ‘हे’ लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय करा

लिपस्टिकच्या शेड्सचं बोलायचं झालं तर सध्या वॉर्म आणि हॉट रंग यांचा ट्रेंड आहे. हिवाळ्यात ओठांवर गडद रंगाची लिपस्टिक सुंदर दिसते.

Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत 'हे' लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय करा
Nupur Chilkulwar

|

Dec 08, 2020 | 2:35 PM

मुंबई : मुलींसाठी मेकअप किटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपस्टिक (Winter Lipstick Colour Trends). पण अनेकदा ऋतूनुसार लिपस्टिकचे रंग निवडणे कठीण होऊन जाते. त्यामुळे अनेकदा चुकीचा रंग निवडल्याने चेहरा तितका खुलून येत नाही. मात्र, हिवाळा हा मेकअपसाठी सर्वात चांगला ऋतू मानला जातो. कारण, या दिवसांमध्ये मेकअप जास्तवेळपर्यंत टिकून राहातो (Winter Lipstick Colour Trends).

लिपस्टिकच्या शेड्सचं बोलायचं झालं तर सध्या वॉर्म आणि हॉट रंग यांचा ट्रेंड आहे. हिवाळ्यात ओठांवर गडद रंगाची लिपस्टिक सुंदर दिसते. अशाच काही आणखी लिपस्टिकच्या रंगांबद्दल आपण जाणून घेऊ

ब्‍लड रेड

हिवाळ्यात महिलांची ब्लड रेड रंगाच्या लिपस्टिकला सर्वाधिक पसंती असते. जर तुम्ही तुमचा मेकअप सिंपल करत असाल तर या रंगाची लिपस्टिक तुमच्या लूकला सहज स्पेशल बनवेल.

पिंक शेड

न्यूड आणि लाल या रंगाच्या मधला शेड म्हणजे गुलाबी रंग. हिवाळ्यात गुलाबी रंगाची लिपस्टिक ट्रेंड करतेय पिंक लिपस्टिकसोबत जर तुम्ही निळ्या किंवा हिरव्या रंगाचं स्वेटर घालू शकतां.

कोकोआ न्‍यूड

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

कोकोआ न्यूड हा रंग कुठल्याही स्किन टोनला सूट करतो. त्यासोबत याच रंगाचा आयशॅडो लावल्यास तुमचं सौंदर्य आणखी खुलून येईल आणि तुम्ही सर्वात हटके दिसाल. महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुले शक्यतोवर मॅट लिपस्टिप लावा नाहीतर तुमची लिपस्टिक स्मज होऊ शकते (Winter Lipstick Colour Trends).

सॉफ्ट न्‍यूड

न्यूड लिपस्टिप नेहमीट ट्रेंडमध्ये असते. जर तुम्हाला नो मेकअप लुक हवा आहे, तर तुम्ही या रंगाची लिपस्टिक लावायला हवी. त्यामुळे तुम्ही नक्कीच वेगळ्या दिसाल. हो पण, हिवाळ्यात लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना लिप बाम लावायला विसरु नका.

वेरी बेरी

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

महिलांमध्ये लाल आणि न्यूड लिपस्टिकशिवाय बेरी रंगही अत्यंत लोकप्रिय असतात. हे शेड तुम्हाला वेगळं आणि हॉट लुक देईल. या लिपस्टिक शेडला ब्राईट रंगाचं स्वेटर किंवा जॅकेट पेअर अप करु शकता.

Winter Lipstick Colour Trends

संबंधित बातम्या :

beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहरा

Divyanka Tripathi | दिव्यांकाप्रमाणे घरगुती स्क्रब वापरा आणि कोरड्या त्वचेच्या समस्येला करा बाय-बाय

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें