Health | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…

Health | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम...
पाणी पिणे फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

Harshada Bhirvandekar

|

Feb 09, 2021 | 4:52 PM

मुंबई : पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, अन्न खाल्ल्यानंतर अर्थात जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते (Do not drink water immediately  after having meal).

तज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते. वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते.

जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी प्यावे!

जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधीच नेहमी पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर किमान अर्धा तासानंतर पाणी प्यावे. कारण अन्न खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटांनंतर पोटात पुढची प्रक्रिया सुरू होते. यानंतर, पाणी पिण्यामुळे पाचक समस्या उद्भवत नाहीत आणि अन्न देखील सहज पचते. दुसरीकडे, जर तुम्ही जेवणादरम्यान थोडे-थोडे पाणी प्याल, तर त्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु, जर आपण अन्नासह भरपूर पाणी प्याल, तर त्यामुळे आपले पोट लगेच भरते. तसेच पोटात फुगवटा देखील निर्माण होतो (Do not drink water immediately  after having meal).

या गोष्टींकडे देखील लक्ष द्या!

– दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी होते. तसेच त्वचेची समस्याही कमी होते.

– आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते.

– दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते.

– नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे.

– शरीराच्या तपमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे देखील आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो.

(Do not drink water immediately  after having meal)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें