Water Benefits | तुम्हीदेखील अशाप्रकारे पाणी पिताय? शरीरासाठी ठरू शकते नुकसानदायक!

Water Benefits | तुम्हीदेखील अशाप्रकारे पाणी पिताय? शरीरासाठी ठरू शकते नुकसानदायक!

आपण पाणी कसे पितो हे महत्त्वाचे नाही, पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य मार्ग देखील आहे, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल.

Harshada Bhirvandekar

|

Jan 25, 2021 | 10:30 AM

मुंबई : आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, लोक पाण्याची त्यांची गरज त्यांच्या पद्धतीने पूर्ण करतात. आपण पाणी कसे पितो हे महत्त्वाचे नाही, पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य मार्ग देखील आहे, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल. चला तर, जाणून घेऊया पाणी पिण्याचा योग्य वेळ व योग्य मार्ग कोणता…(Know how to drink water for good health)

पाणी पिण्याचा योग्य मार्ग :

आयुर्वेदात असे म्हटले आहे की, शरीराच्या तपमानापेक्षा पाण्याचे तप्नाम कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो.

– जास्त थंड पाणी पिण्यामुळे शरीरात कमजोरी येते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोकाही वाढतो(how to drink water).

– तांबेच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी या भांड्यातील पाणी प्या. सलग तीन महिने असे केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढेल. तसेच, आपल्याला मुरुम किंवा त्वचेची समस्या असल्यास ते या आजारांपासूनही आपली सुटका करते.

– शक्य असल्यास, बाटलीमधून थेट पाणी पिणे टाळा आणि ग्लासमध्येच पाणी ओतून ते प्या.

– एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळा.

– जेव्हा आपण आजारी पडता तेव्हा भरपूर पाणी प्या(Know how to drink water for good health).

पाणी पिण्याची योग्य वेळ :

– सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन ग्लास पाणी प्यावे.

– जेवण करण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे आपले अन्न सहज पचते. जेवणानंतर अर्धा तास पाण्याचे सेवन करू नये.

– आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

– झोपण्यापूर्वी अर्धातास आधी एक ग्लास पाणी प्या. यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका होत नाही.

– व्यायामापूर्वी आणि नंतर एक-एक ग्लास पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशन होत नाही.

– तसेच, घराबाहेर पडताना, पाणी अवश्य प्यावे. शक्य असल्यास बाहेर विकत मिळणारे पाणी पिणे टाळावे.

(Know how to drink water for good health)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें