
तूफान फलंदाजीने एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात झळकलेला माजी खेळाडू विनोद कांबळी हा आज मात्र अतिशय खडतर आयुष्य जगतोय. त्याची तब्येत बरी नाही, त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते पाहून चाहते हळहळले होते. विनोद कांबळीची आर्थिक परिस्थिती देखील फार उत्तम नाही. या माजी क्रिकेटपटूचा मित्र आणि यॉर्कशायरमधील क्लब टीममेटने ९० च्या दशकातील त्याच्या काउंटी दिवसांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्याच्याबद्दलच्या अनेक चर्चा, किस्से प्रसिद्ध आहेत. काही मित्रांनी त्याच्याबद्दलच्या आठवणी सांगत, पैशांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा होता, तो कसं आयुष्य जगायचं हे शेअर केलं आहे. वडिलांच्या पैशांबद्दल तर विनोदच्या एका सहकाऱ्याने सांगितलेली आठवण ऐकून तुम्ही हैराणच व्हालय
विनोदच्या माजी सहकाऱ्याने, मित्राने सांगितलं की बरेच लोक प्रेमाने विनोदची आठवण काढत असतात. काहींना अजूनही त्याच्या प्रचंड प्रतिभेवर आणि आत्मविश्वासावर विश्वास बसत नाही. त्यावेळी सचिन तेंडुलकर यॉर्कशायरमध्ये काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. मास्टर ब्लास्टरचा बालपणीचा मित्र असलेल्या कांबळीने त्याच्यासोबत जाऊन जवळच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
असा खेळाडू कधीच पाहिला नाही…
विनोद कांबळीचा मित्र नासा हुसैनने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अनेक खुलासे केले. “दक्षिण आशियाई म्हणून सचिन यॉर्कशायरमध्ये सामील होणे ही मोठी बातमी होती. पण त्याहूनही चांगली गोष्ट काय होती ते मी तुम्हाला सांगतो. तो त्याचा मित्र विनोद कांबळीलाही आमच्या लीगमध्ये खेळण्यासाठी सोबत घेऊन आला होता. एवढ्या जोरात चेंडू फटकावणाऱ्या कोणत्याही खेळाडूला मी आत्तापर्यंत पाहिलचं नाही’ अशी आठवण नासा याने सांगितली.
“तो फक्त धावत ट्रॅकवर यायचा आणि पहिल्याच चेंडूवर सिक्सर फटकवायचा आणि आम्हाला वाटायचं, ‘ठीक आहे’. भारतातील एक तरुण खेळाडू ज्याला यापूर्वी कधीही पाहिला नव्हतं, ज्याच्याबद्दल कधीही ऐकलं नव्हतं, तोच समोर येतो आणि धमाके करतो. नंतर त्याने इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतके झळकावली. तो खूप प्रतिभावान होता. आजच्या काळात तो माणूस करोडपती झाला असता.” असं नासाने नमूद केलं. त्याचं दारूचं व्यसन आणि वारंवार रुग्णालयात दाखल होण्याच्या बातम्या ऐकून काही मित्रांना अजूनही त्याची काळजी वाचते. तो पैसे हाताळण्यात कधीही चांगला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.
आणखी एका साथीदारानेविनोदची आठवण सांगितली. ” एके दिवशी आम्ही 10 क्रिकेटर बसलो होतो, विनोद आणि सचिन वगळता सर्वजण पार्ट-टाइम जॉब्स (अर्धवेळ नोकरी) करत होते. म्हणून मुंबईतील एका क्रिकेटपटूने विनोदला विचारले – ‘तुम्ही एका सामन्यात फक्त 25 पौंड कमावता, तर तुम्ही सॉलीमधील एका ठिकाणी का काम करत नाही?’ त्यावर एक क्षणही विचार न करता विनोद कांबळीने ताडकन उत्तर दिलं. “सचिन आणि मी कसोटी क्रिकेट खेळून पैसे कमवू, मला अर्धवेळ नोकरी करून विचलित व्हायचे नाही ” असं त्याने थेट सांगितलं. विनोद म्हणजे साधारण होता, काय आत्मविश्वास होता त्याला ! la खूप तरुण होता, कसोटी फलंदाज होण्यापासून खूप दूर होता पण त्याच्यात आत्मविश्वास होता,” अशी आठवण मित्रावने सांगितले.
वडिलांचे सगळे पैसे घेतले आणि…
नंतर ॲडमने त्याच्या पुस्तकात कांबळीला एक प्रकरण समर्पित केले आणि लिहिलं : “विनोद, जेव्हा भारतात परतला, तेव्हा त्याने त्याच्या वडिलांकडून सर्व पैसे घेतले आणि ते त्याच्या मित्रांसोबत खर्च केले… विनोदने कधीही पैशाची पर्वा केली नाही, किंवा त्याला गोष्टींबद्दल आदर नव्हता.” अशी आठवण त्याने लिहीली.