AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : भारतात जगतोय तसं आयुष्य विराट कोहलीला नकोय… सोबत खेळलेल्या खेळाडूचं मोठं वक्तव्य

विराट कोहली हा भारताच्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटीपैकी एक आहे. त्याचं प्रत्यक पाऊल हे माध्यमांसाठी, सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरतो. आरसीबीमध्ये त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या लिव्हिंगस्टनने कोहलीबाबात मोठा दावा केला आहे. काय म्हणाला तो ?

Virat Kohli : भारतात जगतोय तसं आयुष्य विराट कोहलीला नकोय... सोबत खेळलेल्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
विराट कोहली
| Updated on: Jun 05, 2026 | 12:53 PM
Share

भारतातीलल सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला, स्टार खेळाडू विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. तो कुठेही गेला, त्यानेही काहीही केलं की लगेच मीडियात, सोशल मीडियावर चर्चा सुरू होता. त्याच्यावर सदैव स्पॉटलाइट असतो. क्रिकेटमध्येही कॅमेरे कोहलीच्या हालचालींवर सतत नजर ठेवून असतात. विकेट घेतल्यानंतरचा त्याचा जल्लोष असो, त्याची मौजमजा असो किंवा इतर काहीही असो, कॅमेरे नेहमी त्याच्यावर असतात. याचं कारण स्पष्ट आहे: चाहत्यांना त्याला पाहायचं असतं आणि त्याच्याबद्दलची चाहत्यांची क्रेझ एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. पण विराटलं तसं आयुष्य नकोय, हा दावा केला आहे लियाम लिविंग्स्टन या खेळाडूने. RCBमध्ये त्याच्यासोबत खेळलेल्या, ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या या खेळाडूच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

मायकल वॉनच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या लियाम लिव्हिंगस्टनला विपाटबद्दल विचारण्यात आलं. “विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये कसा असतो?” त्याववर लिव्हिंगस्टन म्हणाला, “तो अप्रतिम आहे. मी नेहमीच विराटविरुद्ध खेळलो आहे आणि तो नेहमी हसत असतो. जर कोणी उपहासात्मक टिप्पणी किंवा काही कमेंट केली, तर तो नक्कीच प्रत्युत्तर देतो. मैदानावर खूप स्पर्धात्मक असतो.” असं लिव्हिंगस्टनने नमूद केलं.

मैदानाबाहेर एकदम वेगळा

मात्र ज्याक्षणी कोहली मैदानाबाहेर जातो, तो एकदम वेगळा माणूस बनतो. क्रिकेटपासून दूर, तो एक अतिशय शांत आणि प्रेमळ व्यक्ती आहे, त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. तो खूप संयमी आहे, असं लिव्हिंगस्टनने सांगितलं.

” ज्या पद्धतीचं आयुष्य (सतत फोकसमध्ये , लाइमलाइटमध्ये असणं) तो भारतात जगतो, कदाचित त्याला तसं आयुष्य जगायचं नाहीये. सगळ्यांची नजर सतत आपल्यावर असावी असं त्याला वाटत नाही, तो खूप चांगला माणसू आहे. पण मैदानावर उतरताच तो सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बनतो ” असं इंग्लंडच्या खेळाडूने नमूद केलं.

विराट-अनुष्काचं आयुष्य

2017 साली विराट आणि अनुष्काने लग्न केलं. त्यांना वामिका ही मोठी मुलगी आणि अकाय हा मुलगा आहे. विराट कोहली आपल्या कुटुंबासह इंग्लंडला स्थलांतरित झाल्याचं बोललं जातं. तो भारतात मुक्तपणे राहू शकत नाही आणि इंग्लंडमध्ये जसा मोकळेपणाने फिरू शकतो, तसा येथे फिरू शकत नाही, असं त्यामागचं कारण बोललं जातं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...