AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण

वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. | Wankhede Stadium 8 Groundmen tested Corona Positive

IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण
वानखेडे स्टेडियमच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
| Updated on: Apr 03, 2021 | 10:00 AM
Share

मुंबई :   आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत. संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शक मंडळ प्रतिस्पर्धी संघाला कशी मात द्यायची यासंबंधी रणनिती आखण्यात व्यस्त आहे. अशातच वानखेडे स्टेडियममधून मोठी बातमी समोर येतीय. वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. वानखेडे मैदानावर आयपीएलच्या काही मॅेचेस खेळवण्यात येणार आहे. त्याअगोदर ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Wankhede Stadium 8 Groundmen tested Corona Positive before ipl 2021 Started)

19 कर्मचाऱ्यांची टेस्ट, 8 जणांना कोरोनाची लागण

आयपीएलचा रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. वानखेडे स्टेडियमवरही आयपीएलच्या काही सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 ते 25 एप्रिलपर्यंतच्या जवळपास 10 मॅचेस वानखेडे मैदानावर होणार आहे. स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, मैदानावरच्या 19 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

वानखेडेवर 10 तारखेला पहिली मॅच होणार

मुंबईतील वानखेडे मैदानावर 10 एप्रिल रोजी पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत खेळवण्यात येणार आहे. याच मॅचची तयारी सध्या वानखेडेवर जोरदार पणे सुरु होती. परंतु अशातच हे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष ठेऊन आहे.

ऐनवेळी कर्मचारी कुठून आणणार?

वानखेडेवरच्या ग्राऊंड्समनना कोरोनाची लागण झाल्याने आणखीनच धोका वाढला आहे. त्यामुळे एमसीएच्या शरद पवार अकादमी किंवा कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वानखेडेमध्ये काम करायला लागण्याची शक्यता आहे.

आयपीएलचं रण सज्ज, पहिला सामना 9 तारखेला

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Wankhede Stadium 8 Groundmen tested Corona Positive before ipl 2021 Started)

हे ही वाचा :

Video : ‘उडता अशरफ’, सुप्पर से भी उप्पर कॅच; तुम्हीही बघत राहाल!

IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

IPL 2021 : आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा, आता बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतो, रवीचा संघर्षमय प्रवास

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.