AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार…

आयपीएलमध्ये जसा बॅट्समनचा जलवा पाहायला मिळतो तसाच गोलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. Purple Cap IPL 2021

IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार...
kagiso Rabada
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 31, 2021 | 8:18 AM
Share

मुंबई :  इंडियन प्रीमअर लीगची (IPL 2021) सगळ्या संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघाचे जवळपास सगळे खेळाडू इंग्लंडविरुद्धची मालिका संपवून आयपीएलमधल्या आपापल्या फ्रॅचायझींत दाखल झाले आहेत. संघाचे ट्रेनिंग कॅम्पदेखील सुरु झाले आहेत. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यास आता फक्त 9 दिवस बाकी आहेत. आयपीएलमध्ये जसा बॅट्समनचा जलवा पाहायला मिळतो तसाच गोलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. यावर्षी पर्पल कॅप कुणाला मिळू शकते?, पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहे, हे आपण पाहूयात… (Who Can Won Purple Cap in IPL 2021)

बुमराह आणि भुवीमध्ये टक्कर

यंदाच्या मोसमात पर्पल कॅप जिंकण्यासाठी भारतीय जलदगती गोलंदाज यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह आणि स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमार यांच्यात टक्कर पाहायला मिळेल. बुमराहला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वोत्तम बोलर मानलं जातं. परंतु आणखी एकाही मोसमात त्याला पर्पल कॅप मिळाली नाही. या वर्षी जोरदार तयारी करत पर्पल कॅप मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय.

दुसरीकडे ड्वेन ब्राव्होसोबत दुसरा खेळाडू आहे ज्याने दोनवेळा पर्पक कॅप नावावर केली आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वरने 2016 आणि 2017 साली दोन वेळा पर्पल कॅप होल्डर होण्याचा मान मिळवलाय. भुवीने आताच इंग्लंडविरुद्ध जोरदार पुनरागमन केलंय. त्याचा फॉर्मही सध्या चांगला आहे.

रबाडा आणि मॉरिस दावेदार

दक्षिण आफ्रिकेचा हुकमी एक्का कागिसो रबाडा यावर्षी आयपीएलच्या पर्पल कॅपचा मानकरी पुरेपुर प्रयत्न करेल. कारण त्याचा सध्या फॉर्मही जोरात आहे. गेल्या हंगामात (IPL 2021) 17 सामन्यांत त्याने 30 विकेट्स घेतल्या. या वर्षीही बॅट्समनचा कर्दनकाळ ठरण्याचा तो प्रयत्न करेल.

दुसरीकडे ख्रिस मॉरिस देखील शानदार अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षीच्या ऑक्शनमध्ये मॉरिसला आतापर्यंतच्या आयपीएल इतिसाहात सगळ्यात महाग खरेदी केलंय. त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपये मोजले आहेत. तो ही बॅटबरोबर बॉलने धमाल करण्यास सज्ज झालाय.

(Who Can Won Purple Cap in IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पॉटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान