Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा
Khashaba : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून पुन्हा एकदा जिगरबाज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची चर्चा होऊ लागली आहे.

नागराज मंजुळे हे जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा त्याची सर्वोत्तम मांडणी चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर करतात. म्हणूनच ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही गाजले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छापसुद्धा सोडली. आता नागराज आणखी एक दमदार विषय घेऊन नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ‘खाशाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला. जवळपास दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकारांची फळी, अजय-अतुलचं मनाला भिडणारं संगीत आणि मुख्य अभिनेत्याची झलक पहायला मिळाली. या टीझरनंतर खाशाबा जाधव यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. जवळपास 70 वर्षांपूर्वी कोणत्याही अपेक्षा आणि मदतीशिवाय खाशाबा यांनी हेलसिंकीच्या थंडीत भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून आणलं होतं. कुस्तीचे धडे खाशाबा यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील गोलेश्वर गावात झाला. आजही कराडमधील कार्वे गावाच्या वेशीवरच खाशाबा जाधव यांच्या नावाने उभारलेला स्मृतिस्तंभ दिसतो. मुंबईतला नोकरीचा काळ वगळला तर बहुतांशी ते याच गावी राहिले होते....