MI VS CSK, IPL 2021 Match Prediction | आयपीएलमधील 2 चॅम्पियन संघ आमनेसामने, रोहित बाजी मारणार की धोनी मैदान गाजवणार?

Ipl Today Match Prediction of Chennai Super Kings vs Mumbai Indians | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने

MI VS CSK, IPL 2021 Match Prediction | आयपीएलमधील 2 चॅम्पियन संघ आमनेसामने, रोहित बाजी मारणार की धोनी मैदान गाजवणार?
Today Match Prediction of Chennai Super Kings vs Mumbai Indians | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 6:04 PM

नवी दिल्ली | आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आज (1 मे) हायव्होल्टेज लढत होणार आहे. या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ तोडीसतोड आणि यशस्वी आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (who will win chennai super kings vs mumbai indians ipl today match prediction previous match stats 1 may in marathi)

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

उभय संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 वेळा भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा संघ वरचढ राहिला आहे. मुंबईने आतापर्यंत 18 सामन्यात चेन्नईविरोधात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 12 सामन्यात मुंबईवर मात केली आहे. दोन्ही संघांची मागील 5 सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा संघ चेन्नईवर वरचढ राहिला आहे. मुंबईने मागील 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

दोन्ही संघाचा मोसमातील 7 वा सामना

या दोन्ही संघांचा 14 व्या मोसमातील हा 7 वा सामना आहे. तसेच दोन्ही संघ या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने उभे ठाकले आहेत. चेन्नईने 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई 10 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर मुंबईने 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई 6 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

चेन्नईची शानदार कामगिरी

चेन्नईसाठी गेला 13 वा मोसम निराशाजनक राहिला. मात्र या मोसमात चेन्नई शानदार कामगिरी करतेय. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस चांगली फलंदाजी करतायेत. ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाही चांगल्या फॉर्मात आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा तिनही आघाड्यांवर अफलातून कामगिरी करतोय. जाडेजा आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय. वेगवान गोलंदाज दीपक चाहरही दमदार बोलिंग करतोय. त्यामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत आहे.

रोहितच्या पलटणचा संघर्ष

मोसमाच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स धावांसाठी आणि विकेट्साठी चाचपडताना दिसतेय. मुंबईची फलंदाजी 2, 3 जणांवर अवलंबून आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक चांगली फलंदाजी करतायेत. पण मीडल ऑर्डर सुरुवातीपासून अपयशी ठरतंय. इशान किशनला वांरवार संधी देण्यात आली. मात्र त्यानंतर त्याला वगळण्यात आले. पंड्या बंधूंना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर बोलिंगची जबाबदारी बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टच्या खांद्यावर आहे. यामुळे या सामन्यात मुंबई बाजी मारणार की चेन्नई विजयाचा रथ कायम ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021, CSK vs MI Head to Head Records | मुंबई विरुद्ध चेन्नई कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, कोण जिंकणार मॅच?

(who will win chennai super kings vs mumbai indians ipl today match prediction previous match stats 1 may in marathi)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.