IND vs SA T20 : भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यावर पावसाचं सावट

आज दक्षिण आफ्रिकेची मॅच टीम इंडियासोबत सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे

IND vs SA T20 : भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यावर पावसाचं सावट
team india
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 28, 2022 | 1:16 PM

ऑस्ट्रे्लियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आजपासून सुरु होणाऱ्या T20 मालिकेत कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजी पुर्णपणे अपयशी ठरली होती, त्यामुळे टीममध्ये काय बदल करण्यात आला आहे का ? हेही आजच्या सामन्यात पाहायला मिळेल. विराट कोहली (Virat Kohli), सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे फलंदाजांना चांगली लय सापडली आहे.

आज दक्षिण आफ्रिकेची मॅच टीम इंडियासोबत सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे. ही मॅच केरळमध्ये होणार असून तिथं पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देशात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. त्यामुळे आज जिथं मॅच होणार आहे, तिथं सुद्धा 20 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

आजच्या मॅचसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

आजच्या मॅचसाठी दक्षिण आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.