कॅचचे पकडण्यासाठी क्रिकेटरनं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, Viral Video चे सत्य समोर
Cricket Catch Video Viral: क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे सर्वांचे लक्षवेधले त्या गोष्टींकडे जाते. अनेक व्हिडिओ आणि फोटो या व्हायरल होतात.

क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे सर्वांचे लक्षवेधले त्या गोष्टींकडे जाते. अनेक व्हिडिओ आणि फोटो या व्हायरल होतात. सध्या क्रिकेटचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खेळाडूने घेतलेल्या कॅचची सर्वत्र चर्चा होत आहे. भर सामन्यात चेंडू त्या खेळाडूच्या दिशेने येतो आणि तो कॅच घेण्यासाठी ज्यापद्धतीची ती उडी मारते ती आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला खेळाडू दिसत आहे. जी कॅच पकडण्यासाठी ती पूर्णपणे गोलांटी उडी मारताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला क्रिकेटपटू कॅच पकडण्यासाठी धावते आणि नंतर चक्क गोलांटी उडी मारुन तो कॅच पकडते. आता या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगताना दिसत आहे. पण स्पष्टपणे खेळाडूचे तोंड काही दिसत नाहीये. फक्त जर्सीच्या रंगावरुन अंदाज लावला जात आहे. आता हा व्हिडिओ Ai ने बनवलेला दिसत आहे.
Ai व्हिडिओ असल्याचे निकष समोर येत आहे, कारण प्रत्यक्षात असं शक्य नाही. प्रत्यक्षात कोणत्याच खेळाडूला अशा उडी मारणं शक्य नाही. यामुळे हा व्हिडिओ आता Ai ने बनवल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडूचे तोंडही नीट दिसत नाहीये, या मुळे स्पष्टपणे असं समजत आहे की हा व्हिडिओ खरा नाही.
क्रिकेटच्या फिल्डवरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. कारण मैदानात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. पण अनेकदा चुकीचे व्हिडिओही व्हायरल होताना दिसतात. यामुळे चाहते नेहमी संभ्रमात असतात. कधीकधी चाहते पटकन या गोष्टींवर विश्वास ठेवतात, पण नीट पाहिले तर कळतं की हे व्हिडिओ फेक आहेत.