WPL 2023 : दिल्ली की मुंबई! थेट फायनलची संधी कुणाला? दोन पराभवानं असं बदललं गणित

वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तीन संघांमध्ये जर तरची लढाई आहे. त्यामुळे थेट अंतिम फेरीच तिकीट कोणाला मिळणार? हे सर्वकाही शेवटच्या अवलंबून असणार आहे.

WPL 2023 : दिल्ली की मुंबई! थेट फायनलची संधी कुणाला? दोन पराभवानं असं बदललं गणित
WPL 2023 : दिल्ली की मुंबई! थेट फायनलची संधी कुणाला? दोन पराभवानं असं बदललं गणित
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 20, 2023 | 10:22 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आता दिल्ली आणि मुंबईमध्ये अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मुंबईच्या सलग दोन पराभवाने गुणतालिकेतील गणितच बदलून गेलं. दोन पराभवामुळे दिल्ली आणि मुंबईचे गुण सारखेच आहेत. तर रनरेटने दिल्लीने मुंबईला मागे सोडलं आहे. दोन्ही संघांकडे एक एक संधी आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात कोण बाजी मारतं किंवा या रेसमध्ये युपी वॉरियर्स वरचढ ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरसीबी आणि गुजरात जायन्ट्स यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

दिल्लीने सात सामन्यातील पाच सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. दिल्लीचा रनरेट +1.978 इतका असून अव्वल स्थानी आहे. मुंबईने सातपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामन्यात पराभवामुळे 10 गुण झाले आहेत. मुंबईचा रनरेट +1.725 इतका आहे. त्यामुळे  शेवटचा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यात रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

युपी वॉरियर्सलाही थेट अंतिम फेरीत जाण्याची जर तरची संधी आहे. युपीचा शेवटचा सामना दिल्लीशी आहे. हा सामना युपीने जिंकला आणि मुंबईने आरसीबी विरुद्धचा सामना गमावला तर रनरेटवर तिन्ही संघाचं भवितव्य ठरेल. युपीने सात पैकी 4 सामन्यात विजय मिळवत 8 गुण मिळवले आहेत. संघाचा रनरेट -0.063 इतका आहे.

अंतिम फेरीपर्यंतचं गणित कसं असेल

अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी तीन संघ भिडणार आहेत. पण 20 सामन्यानंतर तीन संघांचे सारखेच गुण असतील. तर मात्र रनरेटवर गुणांकन केलं जाईल. ज्या संघाचा रनरेट चांगला आहे तो संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी लढत करेल.

तीन संघ आणि त्यांचे खेळाडू

मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्‍त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्‍यूज, क्‍लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्‍ट आणि जिंतामनी कलिटा.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.

यूपी वॉरियर्स टीम | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्‍ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्‍माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्‍वरी गायकवाड, श्‍वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्‍मी यादव आणि सिमरन शेख.