सॅमसंग गॅलेक्सी एस 9 प्लसच्या किंमतीत मोठी कपात

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी एस 10 सीरिजचा नवा फोन लॉन्च करण्याआधी कंपनीने भारतातील गॅलेक्सी एस 9 प्लसची किंमत कमी केली आहे. येत्या 20 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये गॅलेक्सी एस 10 सीरीज लॉन्च करण्यात येत आहे. यावेळी सॅमसंग तीन डिव्हाईस लॉन्च करणार अशी शक्यता आहे. माहितीनुसार, यावेळी गॅलेक्सी एस 10 लाईट, गॅलेक्सी एस 10 आणि गॅलेक्सी एस …

सॅमसंग गॅलेक्सी एस 9 प्लसच्या किंमतीत मोठी कपात

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी एस 10 सीरिजचा नवा फोन लॉन्च करण्याआधी कंपनीने भारतातील गॅलेक्सी एस 9 प्लसची किंमत कमी केली आहे. येत्या 20 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये गॅलेक्सी एस 10 सीरीज लॉन्च करण्यात येत आहे. यावेळी सॅमसंग तीन डिव्हाईस लॉन्च करणार अशी शक्यता आहे. माहितीनुसार, यावेळी गॅलेक्सी एस 10 लाईट, गॅलेक्सी एस 10 आणि गॅलेक्सी एस 10 प्लस हे स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनी गॅलेक्सी एस 10 प्लसच्या 5G व्हर्जनला यूएस, कोरिया आणि चीनमध्ये विक्रीसाठी उतरवू शकते.

गॅलेक्सी एस 9 प्लसच्या तिन्ही व्हेरीअंटच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अॅमेझॉनवरील किंमतीनुसार,  गॅलेक्सी एस 9 प्लसच्या सुरुवातीच्या 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरीअंटची किंमत 57 हजार 900 रुपयांपर्यंत आली आहे, याची लॉन्चिंग किंमत 70 हजार होती. तर याच्या 128 जीबी व्हेरीअंटची किंमत सध्या 61 हजार 900 रुपयांपर्यंत आली आहे, याची लॉन्चिंग किंमत 84 हजार होती. 256 जीबी व्हेरीअंटची किंमत सध्या 65 हजार 900 रुपयांपर्यंत आली आहे, याला 79 हजार रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आले होते.

गॅलेक्सी एस 9 प्लस या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा क्यूएचडी सूपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम या व्हेरीअंटमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा एक कॅमेरा 12MP+12MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 8MP चा ऑटेफोकस प्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 3500 mAh ची आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *