Honor ची धमाका ऑफर, स्मार्टफोन्सवर सहा हजारांची सूट

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ची सहाय्यक कंपनी Honor ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर स्पेशल सूट दिली आहे. या सेलची सुरुवात 7 मार्चच्या मध्य रात्रीपासून होणार असून 8 मार्चपर्यंत हा सेल असणार आहे. यादरम्यान Honor 9N आणि Honor 7A यासोबतच इतर स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला …

Honor ची धमाका ऑफर, स्मार्टफोन्सवर सहा हजारांची सूट

मुंबई : चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Huawei ची सहाय्यक कंपनी Honor ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर स्पेशल सूट दिली आहे. या सेलची सुरुवात 7 मार्चच्या मध्य रात्रीपासून होणार असून 8 मार्चपर्यंत हा सेल असणार आहे. यादरम्यान Honor 9N आणि Honor 7A यासोबतच इतर स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला या सेलचा लाभ घेता येणार आहे.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्सवर सूट तर मिळणारच आहे, त्यासोबतच नो कॉस्ट इएमआयचं ऑप्शनही मिळणार आहे. इतकंच नाही तर अॅक्सिस बँक, एचडीफसी बँक, आयसीआयसाआय बँक आणि एसबीआय बँकेचं डेबिट कार्ड असणाऱ्यांनाही हे ऑप्शन देण्यात आले आहे. म्हणजे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तरी तुम्ही तुमच्या डेबिट कार्डवर इएमआय बांधून मोबाईल खरेदी करु शकता.

या स्मार्टफोन्सवर सूट मिळणार

Honor 9N : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा फोन तुम्हाला 8,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. याच स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटला 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतो.

Honor 9 Lite : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 6000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.  सेल दरम्यान हा फोन तुम्हाला 7,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर याच्या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटला 10,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Honor 7A : या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे. पण या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांमध्ये मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *