AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon चा बहुप्रतीक्षित Smartphone-TV सेल सुरु, Samsung, Xiaomi, Oppo च्या प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट

Amazon Savings Days Sale: Flipkart नंतर आता Amazon ने स्मार्टफोन आणि स्मार्ट TV वर सेल घोषित केला आहे. ई-कॉमर्स कंपनीने अॅमेझॉन मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली आहे.

Amazon चा बहुप्रतीक्षित Smartphone-TV सेल सुरु, Samsung, Xiaomi, Oppo च्या प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट
Amazon Mobile and TV Savings Days sale
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 17, 2021 | 8:35 PM
Share

मुंबई : Amazon Savings Days Sale: Flipkart नंतर आता Amazon ने स्मार्टफोन आणि स्मार्ट TV वर सेल घोषित केला आहे. ई-कॉमर्स कंपनीने अॅमेझॉन मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली आहे. हा सेल लाईव्ह झाला असून तो 22 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. Amazon सेव्हिंग डेज सेलमध्ये Xiaomi, Samsung, iQOO, OPPO, Tecno आणि Vivo यासह अनेक मोठ्या ब्रँड्सवर उत्तम डील्स आणि डिस्काऊंटसह उपलब्ध आहेत. कंपनीच्या स्मार्टफोन लिस्टमध्ये, Redmi Note 11T 5G, Samsung Galaxy M Series, iQOO Z Series, iQOO 7, Oppo A Series, Tecno Spark 8T, Vivo X60 Series चांगल्या डिस्काउंटवर विकले जात आहेत. (Amazon Mobile and TV Savings Days sale live, check offers on Samsung, Xiaomi, Oppo)

Amazon ने ग्राहकांसाठी बँक ऑफर देखील जाहीर केल्या आहेत ज्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन आणि टीव्हीवर अतिरिक्त सूट मिळण्यास मदत होईल. OneCard क्रेडिट कार्ड किंवा EMI पेमेंट वापरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत 10 टक्के इन्स्टंट सूट मिळेल. ग्राहक त्यांच्या पसंतीच्या स्मार्टफोनवर 12 महिन्यांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI चा देखील लाभ घेऊ शकतात.

Amazon Prime मेंबर्सना या सेलमध्ये अनेक फायदे मिळतील. कंपनीने सांगितले की प्राइम मेंबर्स 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. इतर लाभांबाबत बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 6 महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि अतिरिक्त 3 महिने विनाशुल्क EMI यांचा समावेश आहे.

Xiaomi, Oppo सह अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डील्स

  • Redmi Note 11T 5G, Xiaomi 11 Lite NE 5G आणि Redmi Note 10 Pro Dark Nebula सह नवीन लॉन्च केलेले Xiaomi फोन Amazon मोबाइल आणि टीव्ही सेव्हिंग डेज सेलमध्ये बँक ऑफर आणि इतर सवलतींसह उपलब्ध आहेत. Xiaomi सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीवर अनेक डील्सदेखील ऑफर करेल.
  • Amazon सेव्हिंग डेज सेलमध्ये iQOO, iQOO Z3, iQOO Z5 आणि iQOO 7 या स्मार्टफोन्सवर 1,500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट उपलब्ध आहे.
  • Tecno स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 10 टक्के सूट मिळू शकते. नव्याने लाँच झालेल्या Spark 8T वर देखील डिस्काऊंट मिळू शकतो.
  • Oppo आपल्या स्मार्टफोन्सवर 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI वर 10 टक्के सूट देत आहे. Oppo च्या लेटेस्ट लॉन्चवरदेखील शानदार डील्स उपलब्ध आहेत. ज्यात Oppo A55 आणि Oppo A31 आणि Oppo A74 यांचा समावेश आहे.
  • कंपनी Samsung Galaxy M32 5G आणि Samsung Galaxy M52 5G वर देखील सूट देत आहे. नवीन लाँच केलेल्या फोनव्यतिरिक्त, ग्राहक सॅमसंग एम सीरीजच्या संपूर्ण रेंजवर सूट मिळवू शकतात. सेव्हिंग डेज सेल दरम्यान ते स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर 10 टक्के सूट आणि 6 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI चा लाभ घेऊ शकतात.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Amazon Mobile and TV Savings Days sale live, check offers on Samsung, Xiaomi, Oppo)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती