iPhone यूजर्ससाठी मोठी बातमी! QR कोडचा झंझट संपणार Apple Pay करतोय भारतात येण्याची तयारी
Apple Pay भारतात आणण्यासाठी कंपनीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात Axis Bankच्या क्रेडिट कार्ड्सना सपोर्ट मिळू शकतो. iPhone किंवा Apple Watchला POS मशीनजवळ Tap करून Payment करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे

नुकताच iPhone 18 pro duo लाँच झाला आहे. त्यामुळे सगळेच जण आपल्या नव्या फोनचा आनंद साजरा करत आहेत. त्यातच अॅपल आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर देण्याच्या तयारीत आहेत. भारतात डिजीटल पेमेंट्ससाठी मोठ्या UPI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वस्तू खरेदी करा, गुगल पे उघडा, स्कॅन करा अन् झालं पेमेंट ही सवय आता प्रत्येकाच्या सवयीची झाली आहे. पण आता अॅपल यूजर्सना पेमेंट करण्यासाठी नवीन फिचर वापरण्यात येणार आहे.
Apple Pay म्हणजे काय?
Apple Pay ही Apple डिजीटल पेमेंट सर्व्हिस आहे. जी २०१४ मध्ये अमेरिकेत सुरू झाली होती. यामध्ये यूजर आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मधून सुरक्षितपणे पेमेंट करता येतात.
भारतात लवकरच सुरू होणार ही सेवा
आता भारतामध्ये UPI पाठोपाठ लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. Apple Wallet शी ही पेमेंट पद्धत जोडली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक पेमेंटवेळी बँकिंगचे वेगळे अॅप उघडण्याची गरज राहणार नाही.
हळूहळू Visa आणि Mastercard ला देखील या सेवेला जोडली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अॅपलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.
Apple Pay वर मिळणार Face id आणि Touch id चा फायदा
भारतामध्ये Apple Pay साठी महत्त्वाचा बदल म्हणजे कार्ड पेमेंटमध्ये Biometric Authentication चा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. RBI ने गेल्या वर्षी कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी परवानगी दिल्याने परवानगी दिल्याने Face id आणि Touch id ची सुविधा शक्य झाली आहे.
Axix Bank करणार पार्टनरशिप
भारतातील Apple Pay ची मोठ्या बँकिंग पार्टनरपासून होऊ शकते. यासाठी Axix Bank पार्टनर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या Axix Bank भारतातील मोठ्या क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकांपैकी एक असून, RBI च्या २०२६ जुलै च्या आकडेवारीनुसार १.६२६ कोटी सक्रिय क्रेडिट कार्डस आहेत. Apple भारतात एकाच वेळी अनेक बँकासोबत सेवा सुरू करण्याऐवजी हळूहळू या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.
भारतात केव्हा लाँच होणार
मिळालेल्या माहितीनुसार, Apple Pay भारतात ऑक्टोबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु Apple ने भारतातील Apple Pay लाँचची अधिकृत तारीख तसेच बँकांची नावे अद्याप स्पष्ट केलेली नाही.