AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Betavolt Nuclear Battery | छोटी पण दमदार बॅटरी, 50 वर्षे चार्जिंग करुच नका, चीनचा नवा कारनामा

Betavolt Nuclear Battery | चीनने तंत्रज्ञानात आघाडी घेतलेली आहे. आता तिथल्या Betavolt या कंपनीने मोठी कमाल केली आहे. कंपनीने 50 वर्षे चालणारी बॅटरी तयार केली आहे. या मिनी बॅटरीने मोठी क्रांती येणार आहे. ही बॅटरी बाजारात उतरल्यास, चार्जिंग झंझट छुमंतर होईल.

Betavolt Nuclear Battery | छोटी पण दमदार बॅटरी, 50 वर्षे चार्जिंग करुच नका, चीनचा नवा कारनामा
| Updated on: Feb 02, 2024 | 11:04 AM
Share

नवी दिल्ली | 2 February 2024 : चार्जर सोबत नसेल तर काय अवस्था होते, हे मोबाईल वापरणाऱ्यांना चांगले ठाऊक आहे. कारण बॅटरी फार वेळ फुल चार्ज नसते. बॅटरी उतरली की फोनचा वापर करता येत नाही. पण चीनमधील Betavolt या कंपनीने त्यावर एक तोडगा शोधला आहे. काही तास, महिने, वर्ष नाही तर 50 वर्षांपर्यंत चालणारी बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी न थकता कार्यरत राहिल. विशेष म्हणजे ही बॅटरीचा आकार पण फार मोठा नाही, तर अगदी छोटा आहे.

नाण्याएवढा आकार

चीनची कंपनी Betavolt ने तयार केलेली ही बॅटरी एखाद्या नाण्याऐवढी आहे. या बॅटरीवर प्रयोग सुरु आहे. कंपनी लवकरच बॅटरीत मोठा बदल करण्याची शक्यता आहे. ही बॅटरी बाजारात आल्यास मोठी क्रांती होईल. त्यामुळे मोबाईलचा आकार आणि चार्जरची गरज यावर मोठा परिणाम दिसेल.

बॅटरीचे वैशिष्ट्ये काय

  • चीनच्या कंपनीने विकसीत केलेली या बॅटरीला ना तर चार्जिंगची गरज आहे ना तिला मेंटनेंस असेल. ही बॅटरी अणू ऊर्जेवर चालणार आहे. या बॅटरीचा वापर ड्रो आणि मोबाईलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करण्यात येईल.
  • या बॅटरीत एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये आहेत. बॅटरीत नेहमी आग लागण्याच्या, स्फोटाच्या घटना घडतात. पण चीनच्या कंपनीने दावा केला आहे की, बॅटरीवर दबाव पडल्याने तिचा स्फोट होणार नाही अथवा या बॅटरीला आग लागणार नाही. ही बॅटरी बाजारात आणण्यापूर्वी तिच्यावर अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या आधारे हा दावा करण्यात येत आहे.

ही बॅटरी कसं करणार काम?

इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, आयसोटोपमधील ऊर्जेचे विद्यूतमध्ये रुपांतर होईल. त्यासाठी एक विशिष्ट तंत्र वापरण्यात येणार आहे. पण त्यामुळे बॅटरी गरम होणार नाही अथवा इतर काही नुकसान होणार नाही. पण ही दमदार बॅटरी तयार करण्यासाठी मोठा खर्च आला आहे. त्यामुळे कदाचित ही बॅटरी महागडी असेल.

कुठे-कुठे होणार वापर ?

Betavolt कंपनीने तयार केलेली ही अणू ऊर्जेवरील बॅटरी अनेक सेक्टरसाठी, क्षेत्रांसाठी क्रांती घेऊन येणार आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात तर मोठी क्रांती येईल. या बॅटरीचा वापर एआय उपकरणे, एअरोस्पेस, हायटेक सेन्सर, आरोग्य क्षेत्रातील उपकरणे, मायक्रो प्रोसेसर, छोटे ड्रोन, मायक्रोरोबोट, मोबाईलमध्ये करता येईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच