AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएसएनएलने आयफोनपेक्षाही महागडा फोन केला लाँच, ज्याची किंमत ऐकून व्हाल थक्क…

बीएसएनएलने एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे, ज्याची किंमत आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रापेक्षाही जास्त आहे. चला जाणून घेऊयात की या फोनमध्ये काय विशेष आहे, त्याची किंमत किती आहे आणि तो कोण वापरू शकतात?

बीएसएनएलने आयफोनपेक्षाही महागडा फोन केला लाँच, ज्याची किंमत ऐकून व्हाल थक्क...
BSNL satellite phone launch
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 4:20 PM
Share

भारतात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने भारतात एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. मात्र लाँच करण्यात आलेला हा सॅटेलाइट फोन व्यावसायिक वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. तसेच हा फोन जर तुम्हाला खरेदी करून वापरायचा असेल तर परवानगीशिवाय त्याचा वापर करू शकत नाही. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्टपणे सांगितले आहे की, वापरकर्ते किंवा संस्था केवळ परवानगी मिळाल्यानंतरच या सॅटेलाइट फोनचा वापर करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

सॅटेलाइट फोन कसा फायदेशीर ठरेल?

तुम्ही प्रवासात असताना अगदी जिथे टेरेस्ट्रियल नेटवर्क्स नाहीत अशा भागांमध्येही कम्युनिकेशन नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही कुठेही व्हॉईस कॉल करू शकता आणि गरज पडल्यास आपत्कालीन मदत मिळवू शकता. बीएसएनएल सॅटेलाइट फोन वापरल्याने वापरकर्त्यांना बॅटरीचा जास्त काळ टिकणारा बॅकअपही मिळतो. सॅटेलाइट नेटवर्क्स अशा भागांपर्यंत पोहोचू शकतात जिथे मोबाईल नेटवर्क्स पोहोचू शकत नाहीत.

बीएसएनएल सॅटेलाइट फोनची किंमत

सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीचा हा सॅटेलाइट फोन 1 लाख 34 हजार 166 रूपयांच्या (टॅक्ससहित) किमतीत लाँच करण्यात आला आहे. किमतीच्या बाबतीत हा फोन ॲपल आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि सॅमसंगच्या नवीनतम गॅलेक्सी एस26 अल्ट्रापेक्षा अधिक महाग आहे.

या सॅटेलाइट फोनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बीएसएनएल कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा 9768866652 या क्रमांकावर कॉल करू शकता. बीएसएनएलने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा फोन संरक्षण, सागरी कारवाया, आपत्ती निवारण, खाणकाम, दुर्गम भाग, यात्रेकरू आणि साहसी प्रवासासाठी आदर्श आहे.

सॅटेलाइट फोन मजबूत आणि टिकाऊ असतात. मात्र तुम्ही हा सॅटेलाइट फोन शोधत असाल, तर तो तुम्हाला भारतात कुठेच सहजासहजी मिळणार नाही. कारण भारत सरकार कोणालाही सॅटेलाइट फोन सहजपणे वापरण्याची परवानगी देत ​​नाही. बीएसएनएलने अंदाजे 99 हजार साइट्स लाँच केल्या असून, वापरकर्त्यांना 4जी सेवा देण्यासाठी ते आधीच कार्यरत आहे.

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...