AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7000mAh बॅटरीवाल्या Samsung च्या स्मार्टफोनवर बम्पर डिस्काउंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर

सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे.

7000mAh बॅटरीवाल्या Samsung च्या स्मार्टफोनवर बम्पर डिस्काउंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर
Samsung
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 5:50 PM
Share

मुंबई : दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या F सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने Exynos 9825 प्रोसेसर आणि 7000mAh क्षमतेच्या बॅटरीसह बाजारात उपलब्ध आहे. सोबतच यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 23999 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. दरम्यान, कंपनीने या फोनवर डिस्काऊंट ऑफर जाहीर केली आहे. (Bumper Discount on Samsung Galaxy F62 with 7000mAh Battery, know Specifications and Offer)

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर फॅब ग्रॅब फेस्ट सेल सुरु आहे, हा सेल 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. या विक्री दरम्यान, सॅमसंग गॅलेक्सी F62 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. सेलदरम्यान, या स्मार्टफोनवर 1750 रुपयांची इन्स्टंट कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. ज्यासाठी आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. पेटीएम वॉलेटमधून पेमेंट केल्यावर जास्तीत जास्त 600 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 6GB / 8GB रॅम देण्यात आला असून हा One UI 3.1 वर चालतो. सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर युनिक पॅटर्न मेटॅलिक ग्रेडेशन फिनिश देण्यात आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, Samsung Galaxy F62 स्मार्टफोनची बाजारात OnePlus Nord, Realme X3 SuperZoom आणि Realme X7 5G या स्मार्टफोनसोबत स्पर्धा सुरु आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा sAMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F62 या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Bumper Discount on Samsung Galaxy F62 with 7000mAh Battery, know Specifications and Offer)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.