AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48MP कॅमेरा, दमदार फीचर्स, बम्पर डिस्काऊंटसह Mi 5G फोनचा अमेझॉनवर सेल

शाओमीने (Xiaomi) एप्रिल महिन्यात Mi 11X 5G स्मार्टफोन भारतीय मोबाईल बाजारात लॉन्च केला होता. या फोनमध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत आणि बॅक पॅनेलवर एक उत्तम कॅमेरा मॉड्यूल आहे.

48MP कॅमेरा, दमदार फीचर्स, बम्पर डिस्काऊंटसह Mi 5G फोनचा अमेझॉनवर सेल
Mi 11X 5G
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : शाओमीने (Xiaomi) एप्रिल महिन्यात Mi 11X 5G स्मार्टफोन भारतीय मोबाईल बाजारात लॉन्च केला होता. या फोनमध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत आणि बॅक पॅनेलवर एक उत्तम कॅमेरा मॉड्यूल आहे. हा फोन अमेझॉनवरून डिस्काउंट आणि कॅशबॅकसह खरेदी करता येईल. या फोनमध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 सिरीजचा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात 120hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 33W चा फास्ट चार्जर आहे. (buy Xiaomi Mi 11X 5G with big discount on amazon, know price, features)

हा Mi स्मार्टफोन 26,999 रुपयांमध्ये लिस्टेड आहे, कंपनीने या फोनवरील ऑफरला Deal of the Day असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला HDFC बँक कार्ड पेमेंटवर 4000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, ज्यामध्ये काही अटी आहेत. ही सिरीज अॅमेझॉन वेबसाइटवर सूचीबद्ध आहे.

Mi 11X 5G चे स्पेसिफिकेशन्स

Mi 11X 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा एक AMOLED डॉट डिस्प्ले आहे, जो 1080 × 2400 रिझोल्यूशनस येतो. या फोनमध्ये 2.76 मिमीचा अल्ट्रा टायनी पंच होल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR 10 Plus ला सपोर्ट करतो. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz ला सपोर्ट करतो, जे गेमिंग आणि स्क्रोलिंग सुधारते.

Mi 11X 5G चे फीचर्स

Mi 11X 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870G प्रोसेसर देण्यात आला आहे, जो Kryo 585 Octa-core सह येतो. तो 7nm वर प्रोसेस करतो. कंपनीने यामध्ये लिक्विड कूल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, जे स्मार्टफोन थंड ठेवण्याचे काम करते. या फोनमध्ये दोन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. यात 4520mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरसह येते.

Mi 11X 5G चा कॅमेरा सेटअप

Mi 11X 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो आहे. तसेच 5 मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(buy Xiaomi Mi 11X 5G with big discount on amazon, know price, features)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.