व्हॉट्सॲपचे धमाकेदार नवे फीचर; आता प्रोफाइलवर दिसेल व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट

व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन आणि महत्त्वाचे फीचर आणले आहे. या फीचरमुळे आता युजर्स त्यांच्या व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंटला व्हॉट्सॲप प्रोफाइलवर लिंक करू शकतील. यामुळे अकाउंटची ओळख करणे अधिक सोपे होईल.

व्हॉट्सॲपचे धमाकेदार नवे फीचर; आता प्रोफाइलवर दिसेल व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट
WhatsApp
| Edited By: | Updated on: Aug 27, 2025 | 5:56 PM

इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आणखी एका धमाकेदार फीचरची चाचणी सुरू केली आहे. या फीचरमुळे युजर्सना आपले व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट व्हॉट्सॲप प्रोफाइलवर लिंक करता येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या फीचरवर काम सुरू होते आणि आता ते बीटा युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर सर्वांसाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे.

मेटा अकाउंट सेंटरच्या माध्यमातून लिंक होणार अकाउंट

हे नवीन फीचर युजर्सना मेटाच्या अकाउंट सेंटरद्वारे त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट व्हॉट्सॲप प्रोफाइलशी जोडण्याचा पर्याय देईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे अकाउंट केवळ व्हेरिफाईड असल्यासच लिंक होईल. एकदा का ते लिंक झाले की, व्हॉट्सॲप प्रोफाइलवर एक खास सोशल आयकॉन दिसेल. यामुळे व्हॉट्सॲप युजर्सना लगेच समजेल की समोरच्या व्यक्तीचे अकाउंट खरे आणि अधिकृत आहे.

यापूर्वीही प्रोफाइलवर इन्स्टाग्राम अकाउंट जोडण्याचा पर्याय होता, पण त्यात व्हेरिफिकेशनची सुविधा नव्हती. त्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीचे अकाउंट खरे आहे की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण होत होता. या नव्या फीचरमुळे तो संभ्रम दूर होणार आहे. आता केवळ व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंटच प्रोफाइलवर दिसणार असल्याने युजर्सना खात्री मिळेल की ते ज्या व्यक्तीसोबत बोलत आहेत, ती व्यक्ती खरी आहे.

व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटसाठीही महत्त्वाचे

हे फीचर केवळ वैयक्तिक युजर्ससाठीच नाही तर व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटसाठीही खूप महत्त्वाचे ठरेल. अनेक छोटे-मोठे व्यवसाय आपले प्रॉडक्ट्स किंवा सेवा इन्स्टाग्रामवर दाखवतात आणि व्हॉट्सॲपवरून ग्राहकांशी संवाद साधतात. या नवीन फीचरमुळे ग्राहक बिझनेसच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवरून थेट त्यांच्या व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन माहिती घेऊ शकतील, ज्यामुळे विश्वासार्हता वाढेल आणि व्यवसायाला फायदा होईल.

सध्या फक्त बीटा युजर्ससाठी

हे फीचर सध्या केवळ बीटा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनी बीटा युजर्सकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे यात आवश्यक बदल करून ते टप्प्याटप्प्याने सर्व युजर्ससाठी उपलब्ध करेल. त्यामुळे तुम्हाला जर व्हॉट्सॲपचे लेटेस्ट फीचर्स हवे असतील, तर ॲप नियमितपणे अपडेट करत राहा.

यासोबतच, व्हॉट्सॲपने नुकतेच व्हिडीओ कॉल अधिक चांगल्या करण्यासाठी काही नवीन फीचर्स आणले आहेत. यात आता तुम्ही व्हिडीओ कॉल आधीच शेड्यूल करू शकता आणि कॉल टॅबमध्येही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, व्हिडीओ कॉलदरम्यान थेट प्रतिक्रिया देण्याचा पर्यायही सुरू करण्यात आला आहे.