बायकोला iPhone 18 Pro हवा म्हणून नवऱ्याने चक्क विकले सोने, Video Viral

iPhone 18 Pro ची भारतात विक्री सुरू होताच चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच पत्नीला फोन गिफ्ट करण्यासाठी एका दिल्लीतील व्यक्तीने चक्क सोनं विकलं. नोएडातील Apple Store बाहेरचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

बायकोला iPhone 18 Pro हवा म्हणून नवऱ्याने चक्क विकले सोने, Video Viral
delhi-man-sold-gold-to-buy-iphone-18-pro-for-wife-viral-video-apple-store-noida-iphone-craze-and-shocking-story-behind-expensive-gift
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 5:33 PM

iPhone 18 Pro Max आणि iPhone 18 Pro ची भारतात व्रिकी सुरू होताच iPhone च्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. देशभरातील APPLE स्टोर्सच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यात दिल्लीच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोला iPhone मिळवून देण्यासाठी दागिने विकले आहेत . याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

iPhone खरेदी करून बायकोला दिले सरप्राईज

हा व्यक्ती दिल्लीचा असून नोएडातील एका Apple स्टोरच्या बाहेर लांब रांगेत उभा होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे त्याच्या बायकोला iPhone 18 Pro हवा होता. पण ते घेण्यासाठी नवऱ्याकडे
पुरेसे पैसे नव्हते. तरीही बायकोला iPhone गिफ्ट करण्याचे त्याने ठरवले होते .

iPhoneसाठी चक्क सोनं विकलं

पत्नीसाठी महागडा iPhone घेण्यासाठी पैसे कुठून आणले याचा उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले.या व्यक्तीने iPhone खरेदी करण्यासाठी चक्क दागिने विकल्याचे सांगितले. आज थोडेफार पैसे आहेत, आधी नव्हते, पुढे पैसे असतील कि नाही माहित नाही त्यामुळे पत्नीची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याने सोन विकून iPhone खरेदी करण्याचा निर्णय घेतला. असे त्याने सांगितले.

बायकोची इच्छा पुर्ण करण्यासाठी नवऱ्याने घेतलेल्या या कष्टाचा व्हिडिओ सोशल मीडियावर विशेषत: महिलावर्गात वेगाने व्हायरल होत आहे. बायकोवरील प्रेमापोटी नवऱ्याने घेतलेल्या या निर्णयावर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us