Google वर या 5 गोष्टी सर्च करताना सावधान! एक चूक अन् थेट पोलिस येतील घरी

गुगल सर्च हे आता सर्वांसाठी कॉमन झाले आहे. एआय आलं असलं तरीही गुगल सर्चचा वापर कमी झालेला नाही. पण काही गोष्टी सर्च करताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामागचं कारणं काय आणि नियम फॉलो नाही केले तर त्याचे परिणाम पोलिस केसपर्यंत कसे जाऊ शकतात? हे जाणून घेऊयात...

Google वर या 5 गोष्टी सर्च करताना सावधान! एक चूक अन् थेट पोलिस येतील घरी
what not to search on google in india
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 8:52 PM

सध्या जगामध्ये एआयचं वादळ आलं आहे. एआयमुळे आता गूगल सर्च हा प्रकार थोडा जुना वाटू लागला आहे, असं १०० टक्के जरी नसेल झालं तरीही अनेकजण आता कोणतीही माहिती एआयने सर्च करत आहेत. पण गुगल सर्चचाही वापर मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक गोष्टी गूगलवर सर्च करतात. माहिती घेतात आणि त्यांची कामे मार्गी लावतात.इंटरनेटचा हा काळ सध्या जोमात असला तरी सर्वकाही वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याचं कारण म्हणजे वाढती सायबर गुन्हेगारी.

या गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं असल्याने आता सरकारकडून त्यावर आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून भारतामध्ये काही गोष्टी गुगलसर्च केल्या तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्या सर्च करणं टाळलं पाहिजे.

Loading...

पहिली गोष्ट आहे. पायरेडेट फिल्मसबाबत. होय. पायरेटड फिल्मबाबत गूगल सर्च करु नये. भारतात फिल्म पायरसी करणं हा मोठा गुन्हा मानला जातो. तुम्ही असं केलं तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. इतकंच नाही तर 10 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांसाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. एवढा गंभीर हा गुन्हा आहे.

दुसरी गोष्ट आहे गर्भपात. होय महिलांच्या गर्भपाताबाबत तुम्ही गूगलवर काहीही सर्च करणं हे तुमच्या अडचणी वाढवणारं ठरु शकतं. भारतात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणं बेकायदेशीर आहे. त्याबाबत गूगलवर माहिती सर्च करणंही एक प्रकारचा गुन्हा मानला जातो.

तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे गूगलवर चुकूनही चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च करु नये. भारतात अल्पवयीन मुलां/मुलींबाबत कठोर नियम आहेत. चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च केल्यास पॉक्सो अॅक्ट 2012 च्या 14 के अंतर्गत थेट तुरुंगवास होऊ शकतो. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीडितेचं नाव आणि किंवा तिची ओळख पटेल अशी माहिती सर्च करणं गुन्हा आहे. तसेच गूगलवर हॅकिंग आणि स्पॅमबाबतही सर्च करु नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us