Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart New Year Sale : 1 जानेवारीपासून फ्लिपकार्टचा नवा सेल, ‘या’ वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Flipkart कंपनीने नव्या वर्षानिमित्त नवीन सेल सादर केला आहे. कंपनीने 1 ते 3 जानेवारीदरम्यान FlipStart Days Sale 2021 चे आयोजन केले आहे.

Flipkart New Year Sale : 1 जानेवारीपासून फ्लिपकार्टचा नवा सेल, 'या' वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
इतकंच नाही तर तुम्ही इंधनाचा खर्चही त्यांना करायला सांगून तसं पॅकेज द्या. अशा प्रकारे तुम्ही दुचाकी, इंधन खर्च आणि देखभाल या खर्चापासून वाचाल.
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 5:45 PM

मुंबई : Flipkart या ई-कॉमर्स साईटने महिन्याभरापूर्वी दिवाळीनिमित्त सेल आयोजित केला होता. या सेलमध्ये लोकांनी कोट्यवधी वस्तूंची खरेदी केली. या शॉपिंग फेस्टिव्हल्सदरम्यान स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स देऊन मोबाईल्सची रेकॉर्डब्रेक विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टने नुकताच इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronics Sale 2020) सादर केला होता त्यालादेखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनी आता नव्या वर्षानिमित्त नवीन सेल घेऊन येत आहे. कंपनीने 1 ते 3 जानेवारीदरम्यान FlipStart Days Sale 2021 चे आयोजन केले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना गॅजेट्स, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप आणि घरगुती साहित्यावर अनेक मोठमोठ्या ऑफर्स सादर केल्या आहेत. (Flipkart New Year Sale will go live on january 1)

हेडफोन्सवर 70 टक्के सूट

फ्लिपकार्टच्या या न्यू ईयर सेलमध्ये घरगुती साहित्यावर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सोबतच लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, स्पीकर, कॅमेरा आणि अन्य साहित्यावरही सूट देण्यात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, लॅपटॉप्सवर 20 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. स्मार्टवॉचची किंमत 1,299 रुपयांपासून असेल. हेडफोन्स आणि स्पीकर्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

घरगुती साहित्यावरही डिस्काऊंट

फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये EMI, एक्सटेंडेड वॉरंटी आणि एक्सचेंज ऑफर्ससारखे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने जाहीर कले आहे की, फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि अन्य घरगुती साहित्यावर मोठ्या ऑफर्स दिल्या आहेत. वायरलेस इयरफोन आणि स्मार्टफोन्स नव्या वर्षात योग्य किंमतीत विकले जातील.

ICICI बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सूट

फ्लिपकार्ट कंपनी नव्या सेलपूर्वी आज टीव्ही आणि अन्य साहित्यावर मोठ्या ऑफर्स देत आहे. या ऑफर्स 31 डिसेंबरपर्यंत लागू असतील. फ्लिपकार्ड डेज सेलदरम्यान कंपनीने आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिड कार्ड ग्राहकांसाठी ईएमआयद्वारे वस्तू खरेदी केल्यास इन्स्टंट 10 टक्के डिस्काऊंट देऊ केला आहे. त्यामुळे तुम्ही येत्या काळात नवी स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा अन्य साहित्य खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने चांगली संधी देऊ केली आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Best of 2020 : यावर्षी लाँच झाले ‘हे’ ढासू स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरासह शानदार फिचर्स

Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स

(Flipkart New Year Sale will go live on january 1 as a Flipstart days)

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.