Best of 2020 : यावर्षी लाँच झाले ‘हे’ ढासू स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरासह शानदार फिचर्स

अ‍ॅपल आणि सॅमसंग या टॉप स्मार्टफोन मेकर कंपन्यांसह इतरही अनेक मोबाईल कंपन्यांनी यंदा शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच केले.

Best of 2020 : यावर्षी लाँच झाले 'हे' ढासू स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरासह शानदार फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 4:16 PM

मुंबई : महागडे स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी यंदाचं वर्ष खूप एक्सायटिंग होतं. यावर्षी अ‍ॅपल आणि सॅमसंग या टॉप स्मार्टफोन मेकर कंपन्यांसह इतरही अनेक मोबाईल कंपन्यांनी शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच केले. जर तुम्हालाही जबरदस्त फिचर्स असणारा अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन हवा असल्यास आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात 2020 मधील टॉप 3 स्मार्टफोन्सबाबतची माहिती. (युजर्सच्या पसंतीनुसार टॉप 3 स्मार्टफोन्स निवडण्यात आले आहेत.)

आयफोन 12 प्रो मॅक्स (Apple iPhone 12 Pro Max)

iPhone 12 Pro Max या स्मार्टफोनची किंमत 1,29,900 रुपये इतकी आहे. iPhone 12 सिरीजमधील हा टॉप एंड स्मार्टफोन 256 जीबीपर्यंतच्या स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. iOS 14 पर काम करणाऱ्या या फोनमध्ये 6.7 इंचांचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. सेरेमिक शिल्डसह लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये तुम्हाला दमदार A14 बायॉनिक चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाईड अँगल लेन्ससह एक वाईड आणि एक टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा (Samsung Galaxy Note 20 Ultra)

12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरील सध्याची किंमत 1,04,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 3088×1440 पिक्सल रेजॉलूशनसह 6.9 इंचांचा WQHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 1 TB पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये Exynos 990 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेंससह यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

वनप्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro)

भारतात OnePlus 8 Pro च्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 54 हजार 999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 59 हजार 999 रुपये आहे. ग्लेशियल ग्रीन, ऑनेक्स ब्लॅक आणि अल्ट्रामरिन ब्लू या रंगांमध्ये हे फोन खरेदी करता येतील. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शनचा 6.78 इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या रियर पॅनलवर 48 मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून फोनमध्ये 4510mAh क्षमतेची बॅटरीदेखील देण्यात आली आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

(Best flagship smartphones of 2020)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.