Whats app ला टक्कर देणार आयटी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी, ‘शेड्युल मेसेज’सह मिळणार हे युनिक फिचर्स

व्हाट्स ॲपची मक्तेदारी संपविण्यासाठी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मैदानात उतरली आहे. कोणते आहे ॲप आणि काय आहेत फीचर्स?

Whats app ला टक्कर देणार आयटी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी, 'शेड्युल मेसेज'सह मिळणार हे युनिक फिचर्स
गुगल मेसेजेस Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 10:58 AM

मुंबई, प्रत्येकासाठीच Whats app हे संभाषणाचे प्रमुख माध्यम बनले आहे. ऑफिसचे काम असो किंवा मित्र-मैत्रीणींसोबतच्या गप्पा! प्रत्येकाचेच प्राध्यान्य हे व्हॉट्स ॲपलाच असते, मात्र व्हॉट्स ॲपची ही मक्तेदारी तोडण्यासाठी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल मैदानात उतरली आहे.  गुगल मेसेजेसने व्हॉट्स ॲपला टक्कर देण्यासाठी अनेक आल्यानंतर अँड्रॉइड यूजर्सना एसएमएसमध्येही अनेक चांगले फीचर्स मिळत आहेत. जाणून घेऊया Google Messages च्या काही वैशिष्ट्यांबद्दल.

स्मार्ट रिप्लाय फीचर

Gmail आणि Whatsapp प्रमाणे, Google Messages देखील तुम्हाला न लिहिता रिप्लाय देण्याचे फिचर देत आहे. हे कोणत्याही येणार्‍या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी उपयुक्त पर्याय सुचविते. गुगल मेसेजेसचे स्मार्ट रिप्लाय फीचर सक्षम करण्यासाठी मेसेजच्या सेटिंगमध्ये जाऊन ते अनेबल करावे लागते.

महत्त्वाच्या आणि आवडत्या संभाषणाला पिन करा

यामध्ये तुम्ही आवडत्या किंवा महत्त्वाचे आवडत्या चॅट्स पिन करू शकता आणि त्यांना शीर्षस्थानी ठेवू शकता. यामुळे युजरला सर्व संदेश पुन्हा पुन्हा स्क्रोल करावे लागणार नाहीत आणि पिन केलेले चॅट पटकन उघडण्यास सक्षम असेल. हे करण्यासाठी, कोणत्याही संभाषणावर टॅप करा आणि होल्ड करा, नंतर त्यास शीर्षस्थानी पिन करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

स्पॅम मेसेज फिल्टर

या फीचरच्या मदतीने यूजर्सना कळू शकेल की त्यांना स्पॅम मेसेज पाठवला गेला आहे. तसेच मेसेजमध्ये शेअर केलेल्या लिंक्स किंवा वेबसाइट्स सुरक्षित नाहीत याचीही माहिती दिली जाईल. Google अशा संदेशांवर लाल बॅज आणि उद्गार चिन्ह दाखवते. युजर हा मेसेज स्पॅम आहे की नाही याची पुष्टी करू शकतील. तुम्ही मॅन्युअली कोणताही संदेश स्पॅम म्हणून चिन्हांकित करू शकता.

OTP संदेश 24 तासांनंतर होणार डिलीट

देशातील इंटरनेट बँकिंग सेवा सध्या ओटीपीवर आधारित आहेत. तुमच्या मोबाईलवर पाठवलेला OTP हा तुमच्या बँक खात्यात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आहे. अशा परिस्थितीत गुगलने सुरक्षा वाढवताना ऑटो डिलीटचे फीचर आणले आहे. वापरकर्त्याची इच्छा असल्यास, त्याचा ओटीपी 24 तासांनंतर आपोआप हटवला जाईल. सध्या गुगल मेसेजच्या नवीन अपडेटनंतर ते भारतात रिलीज केले जाईल.

लाईव्ह लोकेशन शेअर करा

Google Messages च्या माध्यमातून तुम्ही आपले लाईव्ह लोकेशन शेर करू शकता. चॅटिंग करताना, खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला खाली लोकेशन पाठवण्याचा पर्याय मिळेल. इथून तुम्ही एखाद्याला पाठवण्यासाठी एखादे ठिकाण शोधू शकता किंवा GPS द्वारे तुम्ही त्यांना तुमच्या वर्तमान स्थानाची माहिती देऊ शकता.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.