
आजच्या या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप फक्त चॅट अॅप राहिलेले नाही, तर ते बँक अलर्ट, वैयक्तिक फोटो, ऑफिस मिटिंग आणि इतर अनेक महत्त्वाच्या माहितीचे माध्यम बनले आहे. त्यात व्हॉट्सॲप हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यात व्हॉट्सअॅप हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड मध्ये सिक्युअर होत असताना सुद्धा ऑनलाइन घोटाळे आणि हॅकिंगच्या घटना वाढत आहेत. वापरकर्त्यांना त्यांची व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याची चिंता सतावत असते. पण तुम्ही आता चिंता करण्याची काही काळजी नाही कारण काही स्मार्ट सेटिंग्ज स्वीकारल्याने तुमच्या व्हॉट्सॲप सुरक्षा लक्षणीयरीत्या मजबूत होऊ शकते, परंतु वापरकर्त्यांनी सतर्क राहणे देखील महत्त्वाचे आहे. चला तर या ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.
तुमचे WhatsApp अकाउंट हॅकिंगपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे टू-स्टेप व्हेरिफिकेशन. हे फीचर तुमच्या व्हॉट्सॲप सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडते. एकदा हे फिचर ऑन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून WhatsApp लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असलेल्या त्या व्यक्तीलाही तुम्ही तयार केलेला 6-अंकी पिन प्रविष्ट करावा लागेल.
या पिनशिवाय, कोणीही तुमचे खाते अॅक्सेस करू शकत नाही. हे फिचर WhatsApp च्या सेटिंग्जमधील अकाउंट विभागात सहजपणे सक्रिय केले जाते आणि तुमचे खाते लक्षणीयरीत्या अधिक सुरक्षित करते.
व्हॉट्सअॅप आता Passkey पर्याय देत आहे, जो अकाउंटच्या सुरक्षिततेला एका नवीन पातळीवर घेऊन जातो. एकदा Passkey ऑन झाल्यानंतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट तुमच्या फोनच्या बायोमेट्रिक सुरक्षिततेशी जोडले जाते, जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक. याचा अर्थ असा की कोणीही फक्त ओटीपी किंवा सिम वापरून तुमचे खाते अॅक्सेस करू शकणार नाही.
Passkey सक्रिय करण्यासाठी, व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि अकाउंट पर्यायाखाली Passkeys वर टॅप करा. या वैशिष्ट्यामुळे हॅकर्सना तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण होते.
अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय किंवा अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल्सद्वारे फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे कॉल्स अनेकदा वापरकर्त्यांना घाबरवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी केले जातात. व्हॉट्सअॅपचे सायलेन्स अननोन कॉलर्स फीचर या धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करते.
हे फीचर सुरू केल्यानंतर, तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल येणार नाहीत, ज्यामुळे तुम्हाला अशा फसवणुकीपासून थेट संरक्षण मिळेल. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘प्रायव्हसि’ विभागातील “कॉल” पर्याय निवडून सक्रिय केले जाऊ शकते.