स्वस्त iPhone च्या नादात होईल नुकसान, फोन विकत घेताना या टिप्स नक्की फॉलो करा

जर तुम्ही सेकंड हँड आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे तुम्हाला सेकंड हँड फोन खरेदी करताना नुकसान सहन करावं लागणार नाही. या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

स्वस्त  iPhone च्या नादात होईल नुकसान, फोन विकत घेताना या टिप्स नक्की फॉलो करा
सेकंड हँड फन विकत घेण्यापूर्वी या टिप्स नक्की वाचा
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 2:41 PM

आयफोन विकत घेणं हे काही प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं, त्यामुळे लोक ऑनलाइन किंवा इतर माध्यमातून स्वस्तात आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याच लोकांना स्वस्तात काही आयफोन मिळत नाही, अशा वेळेस ते सेकंड हँड तरी का होईना आयफोन घेण्याचा प्रयत्न करतात. सेकंड हँड फोन खरेदी करण्यात काही वाईट नसलं तरी काहीवेळा त्यामुळे आपलं नुकसाना होऊ शकतं. तुम्ही कोणताही सेकंड हँड डिव्हाईस किंवा फोन विकत घेत असाल तर तो नीट तपासणे खूप गरजेचे आहे. अन्यथा, काही पैसे वाचवण्याच्या नादात नुकसान होतं आणि तु्म्हाला जास्त पैसे गमवावे लागतात.

पर्चेस प्रूफ करा चेक

जेव्हा तुम्ही सेकंड हँड आयफोन खरेदी कराल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून आयफोनची खरेदी स्लीप (purchase prrof) नक्की मागून घ्या आणि तपासून पहा. त्यावेळी तुम्ही मूळ त्या स्लिपची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तपासू शकता. अनेक वेळा काय होतं, की फोन जुना झाल्यानंतरही वॉरंटी अंतर्गत असतो. जर फोनची मूळ पावती सापडली, तर तुम्ही फोनची वॉरंटी किती याचे डिटेल्स तपासू शकता. याशिवाय, स्लिप तपासून तुम्हाला हे देखील कळेल की फोन त्या व्यक्तीने स्वतः विकत घेतला होता की तो चोरीचा माल आहे .

सीरियल नंबर

फोनची वॉरंटी तपासण्यासाठी तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जवर जा. यानंतर येथे General पर्यायावर क्लिक करा. तेथे अबाउट विभागात जा आणि येथे तुम्ही आयफोनचा सीरियल नंबर तपासू शकता. हा सीरियलनंबर कॉपी करा, नंतर तो checkcoverage.apple.com वर टाका आणि सर्व डिटेल्स तपासा.

बॅटरीवरही द्या लक्ष

आयफोनची बॅटरी ही कोणत्याही फोनच्या बॅटरी इतके आणि त्याच्या कॅमेऱ्याइतकेच महत्वाचे असते. जर आयफोनमधील बॅटरी चांगली नसेल तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. जर आयफोनची बॅटरी 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो फोन विकत घेण्यात काही गैर नाही. पण जर बॅटरीची टक्केवारी यापेक्षा कमी असेल तर फोन खरेदी करण्यापूर्वी नीट विचार करा.

बॅटरीचे आरोग्य तपासण्यासाठी, आयफोनच्या सेटिंग्जवर जा, तेथे बॅटरी ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर बॅटरी हेल्थ आणि चार्जिंगच्या ऑप्शनवर जा. तुम्ही बॅटरीचे आरोग्य तपासू शकत नसाल तर समजावे की तो ख किंवा अस्सल आयफोन नाहीच.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.