जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात 48 जागा, ‘जरांगे’ फॅक्टरचा होणार परिणाम
मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यामुळे मराठवाड्यातील थेट ४८ जागांवर थेट परिणाम होणार हे स्पष्ट झालंय. मात्र कोणाच्या विरोधात उमेदवार देणार यावरून पत्ते उघड करण्यात मनोज जरांगे पाटील तयार नाहीत.
विधानसभा निवडणुकीत आता मनोज जरांगे पाटील यांची एन्ट्री झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर समीकरणं बदलणार असल्याची चर्चा आहे. पण महायुतीत भाजपच्या विरोधात उमेदवार देणार की शिंदेंच्या शिवसेनेविरोधातही तिकीट देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार देताना दोन ते तीन मुद्दे स्पष्ट केले. कोणत्या मतदारसंघात मराठा उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे उमेदवार नाही, एससी एसटी मतदारसंघात उमेदवार देणार नाही, विचारधारा मान्य असल्याचे लिहून देणाऱ्यांना मदत करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ८ पैकी ७ जागांवर महायुतीला चांगलांच फटका बसला. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न दिल्याने ती मतं महाविकास आघाडीकडे गेलीत. तर छत्रपती संभाजीनगरची जागा संदीपान भुमरेंच्या रूपाने निवडून आली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील भाजपचच्या विरोधात उमेदवार देणार की शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

