
मेटाने वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम अॅपमध्ये तीन नवीन फिचर्सची घोषणा केलेली आहे. तर यामध्ये पहिले फिचर्स पोस्ट रीपोस्ट करणे, दुसरे फिचर्स लोकेशन शेअरिंग आणि तिसरे फिचर्स रील्समधील फ्रेंड्स टॅब यांचा समावेश आहे. तर कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती सांगितली आहे की इंस्टाग्रामवरील या तीन फिचर्समधले नवीन रीपोस्ट फिचर्स पब्लिक रील्स आणि फीड पोस्टवर काम करणारे आहे. ज्यामध्ये वापरकर्त्याच्या मित्रांच्या आणि फॉलोअर्सच्या फीड्सला रिक्मेंड करता येईल, जे पाहण्यासाठी इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वतंत्र टॅब म्हणून रेकॉर्ड केले जाणार आहे.
हे फीचर लिंक्डइनसारखेच आहे, कारण वापरकर्ते स्क्रीनवर दिसणाऱ्या थॉट बबलमध्ये टाइप करून आणि सेव्ह बटण दाबून रीपोस्ट करताना एक कॅप्शन देखील जोडू शकतात. टेकक्रंचच्या वृत्तानुसार जूनमध्ये इंस्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी पोस्ट रीपोस्ट करण्याची क्षमता चाचणी केल्यानंतर हे फीचर रोल आउट करण्यात आले आहे.
फॉलोअर्सना त्यांच्या मित्रांसोबत त्यांचे ॲक्टिव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी एक पर्यायी फिचर्स सादर करण्यात आले आहे. हे फिचर्स स्नॅपचॅटवरील ॲक्टिव्ह लोकेशन फिचर्ससारखेच आहे, मात्र इंस्टाग्रामवरील वापरकर्ते कधीही हा फिचर्स बंद करू शकतात. हे फिचर्स वापरकर्त्यांना मित्रांसह तसेच क्रिएटर्सशी कनेक्ट होण्याची संधी मिळते. जेणेकरून वापरकर्त्यांना मित्र आणि क्रिएटर्सला अपडेट मिळते.
मेटाच्या नवीन लोकेशन फीचरचा पालकांना विशेष फायदा होणार आहे, कारण पालक मॅपवरील लोकेशन-शेअरिंग अनुभवाद्वारे त्यांच्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवू शकतात. तुम्हाला तुमच्या डीएम इनबॉक्सच्या वरच्या बाजूला इंस्टाग्राम मॅप दिसेल. हे फीचर प्रथम अमेरिकेत लाँच करण्यात आले आहे आणि आता कंपनी भविष्यात ते इतर देशांमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे.