AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन 18 प्रो लाँच होण्यापूर्वीच आयफोन 17 प्रो झाला स्वस्त, मिळवा इतक्या रुपयांपर्यंतची सूट

तुम्हीही जर बऱ्याच दिवसांपासून आयफोन 17 प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता हा फोन खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे. कारण हा फोन आता तब्बल इतक्या रूपयांच्या सवलतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. चला तर मग या सवलीतबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

आयफोन 18 प्रो लाँच होण्यापूर्वीच आयफोन 17 प्रो झाला स्वस्त, मिळवा इतक्या रुपयांपर्यंतची सूट
| Edited By: | Updated on: Jul 24, 2026 | 8:46 PM
Share

तुम्हाला ही आयफोन 17 प्रो खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण काही महिन्यांतच आयफोन 18 प्रो भारतीय बाजारात लाँच होणार असलयाची माहिती समोर आली आहे. या आगामी मॉडेलच्या लाँचपूर्वी आयफोन 17 प्रो वर मोठी सवलत देण्यात आली आहे. तर तुम्हाला आयफोन 17 प्रो खरेदीवर 9 हजार 410 रूपयांची सुट दिली जाणार आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर हजारो रुपयांची सूट मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या प्रो मॉडेलमध्ये A19 प्रो चिपसेट आणि 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन क्रोमाच्या अधिकृत वेबसाइटवर सवलतीच्या दरात विकला जात आहे.

आयफोन 17 प्रो ची किंमत

ॲपलने हा फोन 1 लाख 34 हजार 900 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता, पण सध्या तो क्रोमाच्या अधिकृत वेबसाइटवर 1 लाख 29 हजार 490 रूपयांना विकला जात आहे. भारतीय बाजारपेठेत या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन गूगल पिक्सल 10 प्रो एक्सएल आणि सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रा 5G सारख्या फ्लॅगशिप फोन्सशी स्पर्धा करतो.

याचा अर्थ लाँच किमतीवर 5 हजार 410 रूपयांची सरळ सूट देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त तुम्ही ICICI, SBI आणि AXIS बँकेच्या क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त 4 हजार रूपयांची सूट देखील मिळवू शकता.

आयफोन 17 प्रो वैशिष्ट्ये

ॲपलच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वेग आणि मल्टीटास्किंगसाठी A19 प्रो प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसमध्ये 120Hz प्रोमोशन तंत्रज्ञानासह 6.3-इंचाचा OLED स्क्रीन, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि अँटी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग आहे. इतकेच नाही तर कंपनीने स्क्रीनच्या संरक्षणासाठी सिरेमिक शील्ड 2 चा देखील वापर केला आहे.

फोटोग्राफीसाठी प्रो मॉडेलमध्ये मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 8x पर्यंत ऑप्टिकल झूम व 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह 48-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी 18-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप