iPhone Duo Sale : iPhone Duo चा सेल सुरू झाला, किती EMI भरावा लागणार, हजारो रूपयांचे डिस्काउंट्स कसे मिळणार? वाचा…

लाखोंची किंमत असलेल्या Foldable iPhoneकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. किंमत जास्त असली तरी EMI आणि Exchangeच्या पर्यायांमुळे खरेदीचा खर्च वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज करता येऊ शकतो.

iPhone Duo Sale : iPhone Duo चा सेल सुरू झाला, किती EMI भरावा लागणार, हजारो रूपयांचे डिस्काउंट्स कसे मिळणार? वाचा...
iphone 18 duo
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 3:53 PM

Apple प्रेमीनी iPhone 18 pro max तर खरेदी केलाच असेल त्यांनी आता iPhone duo ची तयारी करायला लागा. कारण आजपासून iPhone duo मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्धा झाला आहे. लेटेस्ट फोल्डेबल डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, लेटेस्ट कॅमेरा आणि अॅपल इंटेलिजन्सचा हा फोन मास्टरपीस आहे. प्रिमियम डिझाईनसोबत मोठी स्क्रिन आणि कॉम्पॅट फॉर्म असल्याने अॅपल प्रेमींसाठी हा फोन खास ठरणार आहे.फोनची किंमत लाखोंमध्ये आहे. आजपासून सुरू झालेल्या पहिल्या सेलमध्ये बँक ऑफर, नो कॉस्ट EMI आणि जु्न्या एक्सचेंजचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.

iPhone Duo ची किंमत किती

Apple iPhone Duo चार स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 256GB व्हेरिंएटची सुरूवातीची किंमत 2,99,900 रूपये आहे. 512GB मॉडेल्ससाठी 3,24,900 रूपये, 1TB व्हेरिएंटसाठी 3,74,900 आहे. तर 2TB स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत
4,49,900 रूपये आहे.

ऑफर्स कोणत्या मिळणार

पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना बँक ऑफर्स आणि नो कॉस्ट EMI चा पर्याय मिळणार आहे. याशिवाय iPhone Duo वर 7 हजार पर्यंत इंस्टट कॅशबॅकही मिळणार आहे. याशिवाय फोन एक्सचेंजची देखील चांगली किंमत मिळू शकते. त्याची किंमत फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

फोनमध्ये दोन डिस्प्ले

iPhone Duo ची खासियत म्हणजे त्याचा फोल्डेबल डिस्प्ले. फोनमध्ये ५.४ इंचाचा बाहेरील Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन उघडल्यानंतर ७.६ इंचाची आतील Super Retina XDR स्क्रिन मिळते. आतील स्क्रिनला Nano – Texture matte finish देण्यात आली असून यामुळे ग्लेअर आणि स्क्रिनवरील क्रिजची दिसणारी तीव्रता कमी करण्यास मदत होते.

A20 Pro चीपसेट

परफॉर्मन्ससाठी iPhone Duo मध्ये A20 Pro चीपसेट देण्यात आला आहे. यासोबत Apple Intelligencer ची सुविधाही मिळते. हा फोन star white आणि Night Sky या दोन रंगामध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा कसा आहे?

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये अल्ट्रा- व्हाईट अँगल लेन्सचाही समावेश आहे. सेल्फीसाठी बाहेरील आणि आतील दोन्ही डिस्प्लेवर कॅमेरा देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us