3 लाखांचा iPhone 18 pro max रिपेअरींगचा खर्च तब्बल…आकडा वाचून फुटेल घाम, अॅपलचा इन्शुरन्स प्लॅन काय?

iPhone Duoची स्क्रीन फुटली, फोनला इतर अपघाती नुकसान झालं किंवा फोन चोरीला गेला तर वेगवेगळी service fee लागू होणार आहे. त्यासाठी भरपूर पैसेही भरावे लागणार आहेत. जाणून घ्या किती

3 लाखांचा iPhone 18 pro max  रिपेअरींगचा खर्च तब्बल...आकडा वाचून फुटेल घाम, अॅपलचा इन्शुरन्स प्लॅन काय?
iphone 18 Pro REPAIR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 6:11 PM

iPhone Duo ची किंमत ऐकूनच अनेकांना घाम फुटतोय. भारतात या फोल्डेबल iPhone 18 pro ची किंमत २,९९,९०० लाख इतकी आहे. आता एवढा महागडा फोन हातातून निसटला तर काय? याची कल्पनाच करवत नाही. फोनची किंमतच मोठी असल्याने स्क्रिन, बॅक ग्लास किंवा इतर नुकसान झाल्यास दुरूस्तीसाठी किती पैसे मोजावे लागतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

स्क्रिन फुटली तर

AppleCare+ घेतलं असेल आणि iPhone Duo चा फ्रंट डिस्प्ले खराब झाला, तर २,५०० रूपये सर्व्हिस फी द्यावी लागेल. बॅक ग्लास फुटला तरी रिपेअरचे २,५०० रुपयेच आहे. म्हणजे ३ लाखांचा फोन आणि फक्त डिस्प्ले रिपेअरराठी २,५०० चा खर्च आहे.

पण आतली स्क्रिन फुटली तर

iPhone Duo चा इनर डिस्प्ले खराब झाला तर मात्र खर्च वाढतो. यासाठी AppleCare+ अंतर्गत ८,९०० रूपये सर्व्हिस फी आहे. इतर अपघाती नुकसानसाठीही ८,९०० रूपये द्यावे लागतील.

iPhone Duo हरवला तर

फोन चोरीला गेला किंवा हरवला आणि Theft and Loss असलेला Applecare+ प्लॅन घेतला असेल, तर १५,९०० रूपये सर्व्हिस फी लागू होते. मात्र यासाठी संबंधित प्लॅनच्या अटी लागू राहतील.

AppleCare+ प्लॅन कितीला

iPhone Duo साठी दोन वर्षांचा applecare+ प्लॅन ५१,९०० रूपयांचा आहे. Theft and Loss सह प्लॅनची किंमत याची किंमत ५९,९९० रूपये आहे. म्हणजे फोन घेताना फक्त फोनचे पैसे नाही, तर त्याची काळजी घेण्यासाठीही वेगळे पैसे मोजावे लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us