5000 रुपयांहून कमी किंमतीत शाओमीचा नवा फोन लाँच

मुंबई : शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच बजेट फोन म्हणून आपली एक वेगळी ओळख शाओमीने निर्माण केली आहे. शाओमी कंपनी कमी किंमतीत उत्तम फीचर असलेला स्मार्टफोन देते. मात्र इतर कंपन्या शाओमीपेक्षाही अधिक किंमतीत आपले स्मार्टफोन बाजारात विकत असते. यामुळे मोठ्या प्रमाणात आज ग्राहक शाओमीचे फोन खरेदी करण्यासाठी पहिली पसंती देत असतात. […]

5000 रुपयांहून कमी किंमतीत शाओमीचा नवा फोन लाँच
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच बजेट फोन म्हणून आपली एक वेगळी ओळख शाओमीने निर्माण केली आहे. शाओमी कंपनी कमी किंमतीत उत्तम फीचर असलेला स्मार्टफोन देते. मात्र इतर कंपन्या शाओमीपेक्षाही अधिक किंमतीत आपले स्मार्टफोन बाजारात विकत असते. यामुळे मोठ्या प्रमाणात आज ग्राहक शाओमीचे फोन खरेदी करण्यासाठी पहिली पसंती देत असतात. आपले हेच वैशिष्ट्य दाखवत शाओमीने पुन्हा एकदा रेडमी गो स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत पाच हजारांपेक्षाही कमी आहे. हा फोन अँड्रॉईड 8.1 ओरिया ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

या स्मार्टफोनमध्ये रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल देण्यात आला आहे. फोन गरम नको पडावा यासाठी रेडमी गो स्मार्टफोनमध्ये प्लास्टिक ड्युअल ग्रेफाइट शीटचा वापर करण्यात आला आहे.

रेडमी गो स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोअरेज  दिला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही 128 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवू शकता. फोनचा परफॉर्मन्स व्यवस्थित रहावा यासाठी फोनमध्ये लाइट मोड अॅप्स प्री-इंस्टॉल करण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लू आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. ब्लू व्हेरिअंट ग्लॉसी फिनिसोबत आणि ब्लॅक व्हेरिअंट मॅट टेक्स्चरमध्ये मिळत आहे.

स्पेसिफिकेशन आणि फीचरमध्ये हा फोन सर्व फोनप्रमाणे सारखा असेल. पण पाच हजार रुपयांत तुम्हाला जास्तीत जास्त फीचर देणारा फोन म्हणून याचे वेगळेपण आहे.