चुकीच्या नंबरवर Mobile Recharge झाला? काळजी नको पैसे परत मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

मोबाईल रिचार्ज करताना एका चुकीच्या अंकामुळे पैसे दुसऱ्याच नंबरवर गेले तर घाबरू नका. काही परिस्थितीत रिचार्ज रद्द करून रिफंड मिळवण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे रिफंड कसे मिळवायचे जाणून घ्या

चुकीच्या नंबरवर Mobile Recharge झाला? काळजी नको पैसे परत मिळवण्यासाठी लगेच करा हे काम
mobile recharge
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 8:01 PM

मोबाईल रिचार्ज करताना घाईघाईत एक अंक चुकतो किंवा काही वेळेस चुकीच्या नावावर क्लिक होते. त्यामुळे चुकून रिचार्ज दुसऱ्याच नंबरवर होतो मग चांगलीच पंचाईत होते. पैसे काय आता परत येत नाहीत, गेले फुकट असंच अनेकांना वाटत असतं. पण तुम्हाला माहित आहे का की चुकून रिचार्ज झाल्याचे पैसे काही वेळा परत मिळवता येतात. ते कसे जाणून घ्या सविस्तर

सगळ्यात आधी कुठून रिचार्ज केलाय ते पाहा

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही रिचार्ज कोणत्या अॅपवरून केला आहे ते तपासा. जर संबंधित मोबाईल कंपनीच्या अधिकृत अॅपवरून रिचार्ज केला असेल तर काही वेळा तिथे रिचार्ज रद्द करण्याचा किंवा रिफंड मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

थर्ड पार्टी अॅपवरून रिचार्ज केल्यास

जर रिचार्ज एखाद्या थर्ड पार्टी अॅपवरून केला असेल, तर रिफंडची प्रक्रिया वेगळी असू शकते. याशिवाय पैसे परत मिळतील याची खात्री नसते. अशावेळी संबंधित अॅपच्या हेल्प किंवा सपोर्ट पर्यायातून तक्रार करावी.

रिफंडसाठी उशीर करू नका

चुकीचा रिचार्ज झाल्याचं लक्षात आल्यानंतर जितक्या लवकर रिफंड प्रक्रिया कराल तितकेच रिफंड मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण जर उशीरा केलात तर पैसे रिफंड मिळतील की नाही याची खात्री नसते.

रिचार्जचा रिफंड कुठे जमा होतो

रिफंडसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांनुसार पैसे परत मिळू शकतात. काही वेळेस INSTANT CREADIT किंवा संबंधित कंपनीच्या वॉलेटमध्ये रक्कम जमा होते. त्यामुळे रिफंड घेताना पर्याय व्यवस्थित निवडा.

रिचार्ज करण्यापूर्वी नंबर दोनवेळा तपासा

रिचार्ज करण्यापूर्वी मोबाईल नंबर दोनदा तपासणं हा सगळ्यात सोपा पर्याय आहे. कारण चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्यानंतर रिफंड मिळण्याची प्रक्रिया प्रत्येक कंपनीमध्ये असतेच असं नाही. त्यामुळे रिचार्ज करताना दोन वेळा नंबर तपासावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us