सर्वांनाच मिळणार नाही Nothing Phone 1… खरेदी करण्यासाठी ‘या’ गोष्टीची पूर्तता करा…

| Updated on: Jun 26, 2022 | 2:42 PM

नथिंग लवकरच आपला पहिला फोन लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या फोनसाठी OnePlus फॉर्म्युला स्वीकारल्याचे दिसून येत आहे. कंपनी या फोनची विक्री खास इन्व्हाइटद्वारे करणार आहे. हा फोन सर्वांनाच बूक करता येणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सर्वांनाच मिळणार नाही Nothing Phone 1... खरेदी करण्यासाठी ‘या’ गोष्टीची पूर्तता करा...
Follow us on

मुंबई : नथिंग आपला पहिला स्मार्टफोन (smartphone) भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँच करणार आहे. लाँच होण्याआधीच या स्मार्टफोनबद्दल बरीच चर्चा सुरु झालेली आहे. नथिंग फोन 1 (Nothing Phone 1) जुलैमध्ये लाँच होत आहे. त्याची वैशिष्ट्ये, स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइनबाबतची अनेक माहिती समोर आली आहे. 12 जुलैला हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी ग्राहक या फोनची प्री-ऑर्डर करू शकाल. या स्मार्टफोनच्या ट्रांन्सफरंट बॅक आणि एलईडी (LED) लाईट्सची खूप चर्चा रंगली असली तरी फोनची अद्याप सर्व वैशिष्ट्ये उघड झालेली नाहीत. फोनबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. फोनच्या प्री-ऑर्डरची माहिती समोर आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कसा खरेदी करू शकतील, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

अशी करा बुकिंग

ग्राहक फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. ग्राहकांना हा स्मार्टफोन बुकिंगसाठी प्री-ऑर्डर पास खरेदी करावा लागेल. पास खरेदी केल्यावर, कंपनी तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर एक आमंत्रण कोड पाठवेल. तुम्ही या कोडद्वारेच प्री-ऑर्डर पास खरेदी करू शकाल. लक्षात ठेवा की प्रवेश पास मिळविण्याचा हा एकमेव मार्ग असणार आहे.

विशेष प्री-ऑर्डर पास

युजर्सना 2000 रुपये रिफंड डिपोझिट जमा करून पास सिक्योर करावा लागेल. यासह, युजर्सना विशेष किंमतीत नथिंग फोन 1 च्या अॅक्सेसरीज मिळतील. याव्यतिरिक्त, युजर्सना एक विशेष प्री-ऑर्डर पास देखील मिळेल. 12 जुलै रोजी रात्री 9 वाजता, युजर्सना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलने फ्लिपकार्टवर लॉगइन करावे लागेल आणि नथिंग फोन 1 च्या प्रीऑर्डरचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हा हँडसेट खरेदी करू शकाल.

हे सुद्धा वाचा

काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?

या स्मार्टफोनला 120Hz रिफ्रेश रेटसह OLED पॅनल देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50MP मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा असेल. यात 4,500mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग मिळेल. हा फोन Android 12 वर आधारित Nothing OS वर काम करेल.