AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता व्हॉट्सअपवर मिळणार कर्ज, ना कर्जाच्या अर्जाची गरज ना कागदपत्रांची, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया..

माहितीच्या आधारे कर्जसीमा ठरवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल, याची माहिती देण्यात येईल. तुमच्याकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर हा आकडा निश्चित करण्यात येईल. केवळ पगारी नोकरदारांसाठीच ही सुविधा असणार आहे.

आता व्हॉट्सअपवर मिळणार कर्ज, ना कर्जाच्या अर्जाची गरज ना कागदपत्रांची, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया..
whatsappImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 7:47 PM
Share

नवी दिल्ली – मुंबईस्थित कर्ज देणाऱ्या CASHe या प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअप क्रेडिट लाईन (Whatsapp Credit Line) सर्व्हिस सुरु करण्याची घोषणा केली आहे. या योजेनेंतर्गत व्हाट्सअप युझर्स (Whatsapp users)कादपत्रांविना, कुठलाही अर्ज न भरता आणि कोणतेही एप डाऊनलोड न करता तत्काळ कर्ज (instant loan) मिळवू शकणार आहेत. या सेवेचा उपयोग करण्यासाठी कैशे केच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर हाय असे टाईप करुन पाठवायचे आहे. अशा प्रकाराची कोणत्याही कागदपत्राविना कर्ज देणारी पहिली फिनटेक अंटरप्रायजेझ असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

कसे मिळेल कर्ज

एआय-पॉवर्ड बॉटच्या सहाय्याने कंपनी ही सेवा कार्यरत करते आहे.

  1. कैशे कीच्या मदतीने तत्ताळ कर्ज मिळवण्यासाठी युझर्सना पहिल्यांचा त्यांचा नंबर सेव्ह करावा लागणार आहे.
  2. त्यानंतर व्ह़ॉट्सअप चॅटमध्ये जाऊन हाय असा मेसेज इंग्रजीत पाठवावा लागणार आहे.
  3.  हा मेसेज पाठवल्यावर दोन पर्याय येतील, पहिला पर्याय गेट इन्स्टंट क्रेडिट आणि दुसरा ऑप्शन्स
  4.  कर्ज मिळवण्यासाठी तुमन्हाला गेट इन्स्टन्ट क्रेडिटवर क्लिक करावे लागेल.
  5.  त्यानंतर तुमच्या पॅन कार्डवर जे नाव आहे ते तुम्हाला टाईप करावे लागणार आहे.
  6.  त्यानंतर कैशे केच्या प्रायव्हसी पॉलिसी आणि टर्म्स अँड कंडिशन्सला तुम्हाला होकार द्यावा लागेल.
  7.  त्यानंतर तुमचा पॅन नंबर तुमच्या समोर येईल तो तुम्हाला कन्फर्म करावा लागेल.
  8.  पॅन नंबर चे्क केल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख सांगावी लागणार आहे.
  9.  त्यानंतर यंत्रणेकडून तुमचे केवायसी चेक करण्यात येईल, त्यासाठी प्रोसिड टू चेकवर क्लिक करावे लागेल.
  10.  केवायसी चेक झाल्यानंतर तुमचा पत्ता समोर येईल, तो तुम्हाला कन्फर्म करावा लागेल.
  11.  हे सर्व तपासल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळणार की नाही, हे सांगण्यात येईल

जास्तीत जास्त किती कर्ज मिळणार

या फिचरमुळे एआय-पॉवर्ड मोडमधून केवायसी चेक आणि व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर तुमची कर्जसीमा ठरवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल, याची माहिती देण्यात येईल. तुमच्याकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर हा आकडा निश्चित करण्यात येईल. केवळ पगारी नोकरदारांसाठीच ही सुविधा असणार आहे.

ग्राहकांना आता हवाय तातडीचा आणि कॉन्टक्टलेस सपोर्ट

कॅश केचे संस्थापक अध्यक्ष वी रमन कुमार यांनी सांगितले आहे की, या सेवेत कस्टमर फर्स्ट हा आमचा हेतू आहे. सध्याच्या स्मार्ट ग्राहकांना लगेच आणि संपर्काविना सपोर्ट हवा असतो. आम्ही व्हॉट्सअपवर त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. इंटस्ट्री फर्स्ट आणि नवकल्पनेची सर्व्हिस आमचा ग्राहकांना अधिक सशक्त करेल.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.