खरचं!!! कोईम्बतूरसह बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर आपल्या सवेत असेल AI रोबोट; प्रवाशांना मदत करणार, मार्गही दाखवणार

यामुळे विमानतळावर उपस्थित प्रवाशांचा अनुभव सुधारण्यास मदत होईल, असे कोईम्बतूर विमानतळाच्या ट्विटर अकाऊंटने म्हटले आहे. एवढेच नाही तर हा रोबो लहान मुलांनाही मदत करू शकतो.

खरचं!!! कोईम्बतूरसह बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर आपल्या सवेत असेल AI रोबोट; प्रवाशांना मदत करणार, मार्गही दाखवणार
रोबोट
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 24, 2022 | 7:31 PM

कोईम्बतूर : विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर लोकांना अनेकदा इतरांची मदत घ्यावी लागते. अशा लोकांची गरज समजून कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारा रोबोट आणण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) हा रोबोट सादर केला आहे. विमानतळावर येणाऱ्या लोकांना काही मदत (Aid) हवी असल्यास हा रोबोट विचारतो. त्याच्याकडे कोणी मदत मागितली, तर रोबोटही (Robots) त्यांना शक्य तितकी मदत करतो. एवढेच नाही तर हा रोबो मार्गही दाखवतो. विमानतळावर उपस्थित असलेला हा रोबो आपोआप काम करतो. हा इतरांच्या मदतीसाठीच प्रोग्राम करण्यात आला आहे. या मदतीने विमानतळावर उपस्थित प्रवाशांना अनेक सेवांचा लाभ घेता येणार आहे. अनेक वेळा बॅग चेकइनमध्येही लोकांना अडचणी येतात.

लहान मुलांनाही मदत

यामुळे विमानतळावर उपस्थित प्रवाशांचा अनुभव सुधारण्यास मदत होईल, असे कोईम्बतूर विमानतळाच्या ट्विटर अकाऊंटने म्हटले आहे. एवढेच नाही तर हा रोबो लहान मुलांनाही मदत करू शकतो, असे ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. तर कोईम्बतूर विमानतळावर उपस्थित असलेल्या या रोबोटची मदती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही घेतली. ज्याचा एक व्हिडिओ त्यांनी रिट्विट केला आहे. रोबोट त्यांना रस्ता दाखवत पुढे चालत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे अशा लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल, ज्यांना अनेकदा विमानतळावर उपस्थित कर्मचाऱ्यांची मदत घ्यायची असते.

हे सुद्धा वाचा

सध्या चाचणी अंतिम टप्प्यात

दरम्यान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने देखील प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चालित असिस्टन्स रोबोट सादर केला आहे. सध्या चाचणी अंतिम टप्प्यात आहे. तर येथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विमानतळावर दहा रोबोट तैनात करण्यात आले आहेत असेही मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें