आयफोन 13 बनला जगातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 10 सर्वाधिक विक्री होणारे फोन

एप्रिल 2022 च्या 10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या फोनच्या यादीत iPhone SE 2022 ने आपले स्क्षान मिळवले आहे, एवढेच नव्हे तर एकट्या Apple चे पाच स्मार्टफोन टॉप-10 बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या यादीत नोंदविले गेले आहेत. एप्रिल महिन्यात जपानमध्ये iPhone SE 2022 चा मार्केट शेअर तब्बल 18 टक्के इतका राहिला आहे.

आयफोन 13 बनला जगातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 10 सर्वाधिक विक्री होणारे फोन
आयफोन
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 24, 2022 | 10:12 PM

एप्रिल 2022 मध्ये ॲप्पलने (Apple) ग्लोबल बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या यादीत बाजी मारली आहे. काउंटरपॉईंटच्या (Counterpoint) नुकत्याच जाहिर झालेल्या एका रिपोर्टनुसार, iPhone 13, iPhone 13 Pro Max, iPhone 13 Pro आणि iPhone 12 ने एप्रिल 2022 मध्ये जगातील 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत टॉप-4 मध्ये आपले स्थान मिळवले आहे. या यादीत रेडमी आणि सॅमसंगच्या फोनचाही समावेश आहे. टॉप 10 सर्वाधिक विकले जाणारे फोन संपूर्ण स्मार्टफोन (smartphone) मार्केटमध्ये 21 टक्के शेअर होल्डर ठरले आहेत. भारतासह जगभरात ॲप्पलचे ग्राहक मोठे आहेत, शिवाय ॲप्पल आपल्या विविध स्मार्टफोनमध्ये नवनवीन अपग्रेटदेखील आणत असल्याने ग्राहकांचे त्याकडे आकर्षण वाढत आहे. ॲप्पल प्रीमिअम फोनसाठी प्रसिध्द असल्याने कंपनीकडून आपला टार्गेट ग्राहक ठरविण्यात येत असतो.

iPhone 13 चा बोलबाला

काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, iPhone 13 सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन म्हणून समोर आला आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये त्याचा वाटा 5.5 टक्के इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावर 3.4 टक्के मार्केट शेअरसह iPhone 13 Pro Max आणि तिसऱ्या क्रमांकावर iPhone 12 सह iPhone 13 Pro अनुक्रमे 1.8 टक्के आणि 1.6 टक्के मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे. iPhone SE 2022 एप्रिल 2022 च्या 10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या फोनच्या यादीत आहे, म्हणजेच एकट्या Apple चे पाच स्मार्टफोन टॉप-10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोनच्या यादीत समाविष्ट आहेत. एप्रिल महिन्यात जपानमध्ये iPhone SE 2022 चा मार्केट शेअर 18 टक्के राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

सॅमसंग, रेडमीचाही समावेश

दरम्यान, या यादीत Samsung Galaxy S22 Ultra 5G आणि Samsung Galaxy A13 अनुक्रमे 5 आणि 6 व्या क्रमांकावर आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाले आहेत. या दोन्ही फोनचा मार्केट शेअर अनुक्रमे 1.5 टक्के आणि 1.4 टक्के राहिला आहे. Galaxy A13 ची 50 टक्के विक्री भारत आणि लॅटिन अमेरिकेत झाली आहे. Galaxy A03 Core आणि Galaxy A53 5G विक्रीच्या बाबतीत टॉप-10 यादीत आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. Redmi Note 11 LTE ला 10 वे स्थान मिळाले आहे. रेडमीच्या या फोनचा एप्रिल 2022 मध्ये मार्केट शेअर 1.3 टक्के आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें