2026 मध्ये तुमचं घर आनंदाने भरलेलं राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टीं घरात करा समाविष्ट
2026 हे नवीन वर्ष जवळ येत आहे आणि वास्तुशास्त्रानुसार, येत्या नवीन वर्षात तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही उपाय आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

2026 हे नवीन वर्ष काही दिवसांनी आपण सर्वजण मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहोत. तसेच आपल्या सर्वांना नवीन वर्ष भरपूर आनंद आणि सौभाग्य घेऊन यावे असे वाटते. यासाठी प्रत्येकजण आपली घरं स्वच्छ करून सजवतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त घर सजवल्याने घरात आनंद वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला चांगले अन्न आणि हवा आवश्यक असते, त्याचप्रमाणे आपल्या घरांनाही तेथे राहणाऱ्या प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी सकारात्मक उर्जेची आवश्यकता असते.
तर या नवीन वर्षात 2026 मध्ये, काही खास बदल का करू नयेत जे आपल्या घराला खऱ्या अर्थाने आनंदाने व सकारात्मकेतेने भरभरून ठेवतील. वास्तुशास्त्रानुसार काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे जर आपल्या घरात समाविष्ट केले तर ते सर्व नकारात्मकता दूर करतील आणि प्रत्येक कोपऱ्यातून सकारात्मक भावना आणतील. चला तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
1. घरात वास्तुनूसार रोपं लावणे
आजच्या धावपळीच्या जीवनात तुमच्या घरात छोटी हिरवीगार रोपं असणे हे एक आशीर्वाद आहे. 2026 मध्ये मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि पीस लिली सारखी रोपं घरात लावा. वास्तुनुसार आग्नेय दिशेने मनी प्लांट लावल्याने संपत्तीचा प्रवाह वाढतो, तर स्नेक प्लांट घरात संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा आणतो.
2. सैंधव मीठ
ही हजार वर्षांची परंपरा आजही तितकीच प्रभावी आहे. तुमच्या घराच्या शांत कोपऱ्यात किंवा बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात सैंधव मीठ भरून ठेवा. मीठात ओलावा आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची उल्लेखनीय क्षमता असते. दर 10-15 दिवसांनी सैंधव मीठ बदला. हा उपाय घरगुती संघर्ष कमी करण्यास आणि मनःशांती राखण्यास मदत करू शकतो.
3. नैसर्गिक सुगंधयुक्त वस्तू
2026मध्ये आर्टिफिशयल स्प्रे पैक्षा नैसर्गिक सुगंधांना प्राधान्य द्या. चंदन, लैव्हेंडर किंवा गुलाबाचा सूक्ष्म सुगंध केवळ तुमचा मूड चांगला करत नाही तर तुमच्या घरातील वातावरण देखील शुद्ध करतो. तुम्ही डिफ्यूझर किंवा सुगंधी तेल वापरू शकता, जे तुमचे मन शांत करण्यास आणि चांगली झोप घेण्यास मदत करेल.
4. वैयक्तिक आध्यात्मिक चिन्हे
तज्ञ तुमच्या घरात फक्त आध्यात्मिक चिन्हे जसे की बुद्ध मूर्ती, श्रीयंत्र किंवा ओम ठेवण्याची शिफारस करतात ज्यांचा वैयक्तिक संबंध आहे. ही चिन्हे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. खात्री करा की ही केवळ सजावटीच्या वस्तू नाहीत तर तुमच्या भक्तीचे केंद्र आहेत.
5. घरात मोकळी जागा
सकारात्मक उर्जेसाठी हवा आणि प्रकाश आवश्यक आहे. 2026 चा सर्वात मोठा मंत्र म्हणजे क्लटर फ्रि होम. तुमच्या घरातून अनावश्यक जुन्या वस्तू, तुटलेली भांडी आणि वापरत नसलेले फर्निचर काढून टाका. तुमचे घर जितके हलके असेल तितके सकारात्मक उर्जेचा प्रवाह आत येणे सोपे होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
