वनप्लसचा नवा फोन खास ऑफर्ससह 16 नोव्हेंबरपासून बाजारात

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : वनप्लसचा नवा फोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. भारतात ‘वनप्लस 6T’ लाँच केल्यानंतर आता कंपनीकडून नवीन फोन ‘वनप्लस 6T थंडर पर्पल एडिशन’ लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात आला. 16 नोव्हेंबरपासून भारतातही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वनप्लस 6T च्या थंडर पर्पल एडिशनचं व्हेरिएंट 16 […]

वनप्लसचा नवा फोन खास ऑफर्ससह 16 नोव्हेंबरपासून बाजारात
Follow us on

मुंबई : वनप्लसचा नवा फोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. भारतात ‘वनप्लस 6T’ लाँच केल्यानंतर आता कंपनीकडून नवीन फोन ‘वनप्लस 6T थंडर पर्पल एडिशन’ लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात आला. 16 नोव्हेंबरपासून भारतातही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

वनप्लस 6T च्या थंडर पर्पल एडिशनचं व्हेरिएंट 16 नोव्हेंबरपासून अमेझॉन इंडियावर ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. हा फोन तुम्ही दुपारी 2 वाजल्यापासून खरेदी करु शकता. दुकानांमध्येही हा फोन उपलब्ध असणार आहे. क्रोमा, रिलायन्स डिजीटल आणि वनप्लस या स्टोअरमध्ये हा फोन उपलब्ध असेल. या नवीन फोनची किंमत 41,999 रुपये असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबीचं स्टोरेज देण्यात आलंय.

या नव्या फोनसाठी खास लाँचिंग ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. HDFC क्रेडिट कार्ड युझर्ससाठी 1500 रुपये इस्टंट डिस्काउंट आहे. तर अमेझॉनच्या युझर्सना 500 रुपयाचा डिस्काऊंट मिळणार आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध असेल. कुपन्सच्या माध्यमातून रिलायन्स जिओ युजर्सना 5400 चा इंस्टट कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यात युझर्सला दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. या 36 महिन्यांत यूजर्सला एकूण 3 हजार जीबीचा 4G डेटा दिला जाणार आहे.

वनप्लस थंडर पर्पल एडिशनचे फीचर्स

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 SoC चा वापर केला आहे. 6.41 इंचाची फुल एचडी प्लस स्क्रीन आहे. बॅटरी क्षमता 3700mAh आहे. रिअर कॅमेरा 20 मेगापिक्सल देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. फोन अँड्रॉईड ओएस UI वर काम करतो. इनस्क्रीन फिंगरप्रिंट मिळणार आहे.